दुचाकी चोरट्याला रामनगर पोलिसांच्या डीबी पथकाने केली अटक – चार दुचाकी जप्त

रामनगर पोलिसांनी दुचाकी चोरट्याला अटक केली असून चोरीतील 4 दुचाकी जप्त केल्या आहेत.राहुल खैराती असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. चंद्रपूर शहरातील बंगाली कॅम्प परिसरात रामनगर पोलिस डीबी पथकाचे संदीप कापडे व त्याच्या टीम ने ही कारवाई केली आहे. आरोपिकडून पोलिसांनी चार दुचाकीसह 1 लाख पाच हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपीची कसून चौकशी सुरू आहे. त्यामुळे आणखी चोरीतील दुचाकी मिळण्याची शक्यता आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रकाश हाके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदिपण कापडे सूनिल जाधव रजनीकांत पुढंनवार पुरुषोत्तम चिकाटे संनय चोधरी विकास जुमनाके सतीश अवयरे करीत आहेत.

कृषी विषयक कायद्यांना राज्‍य सरकारने दिलेली स्‍थगिती त्‍वरीत दूर करा – डॉ. मंगेश गुलवाडे

महाविकास आघाडी सरकारच्‍या विरोधात भाजपा महानगर शाखेचे चंद्रपूरात निषेध आंदोलन

नवीन कृषी कायद्यामुळे देशातील शेतकरी बंधमुक्‍त आणि दलालांच्‍या जोखडातून मुक्‍त होणार असून आपल्‍या कष्‍टाने पिकविलेल्‍या शेतमालाची विक्री व बाजारपेठेत त्‍यांना स्‍वातंत्र्य मिळणार आहे. पंतप्रधान मोदीजींनी एमएसपी कुठल्‍याही परिस्‍थीतीत बंद होणार नसल्‍याचे स्‍पष्‍ट केले आहे. या कृषी सुधारणा विधेयकामुळे शेतक-यांना ख-या अर्थाने स्‍वातंत्र्य मिळणार आहे, मात्र शेतक-यांबाबत महाविकास आघाडी सरकारने पुतना मावशीचे प्रेम दाखवत या कृषी विषयक कायद्याला स्‍थगिती दिली आहे. ही स्‍थगिती त्‍वरीत उठवावी व राज्‍यात केंद्राच्‍या या कायद्याची अंमलबजावणी करावी यासाठी हे निषेध आंदोलन आम्‍ही करीत असल्‍याचे प्रतिपादन भाजपाचे महानगर अध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी केले.

गांधी चौक चंद्रपूर येथे भाजपा महानगर शाखेतर्फे महाविकास आघाडी सरकारच्‍या विरोधात निषेध आंदोलन करण्‍यात आले. या आंदोलनात डॉ. मंगेश गुलवाडे यांच्‍यासह भाजपा नेते राजेंद्र गांधी, प्रकाश धारणे, महापौर सौ. राखी कंचर्लावार, उपमहापौर राहूल पावडे, मनपा गटनेता वसंत देशमुख, भाजयुमो महानगर अध्‍यक्ष विशाल निंबाळकर, मनपा सदस्‍य सुभाष कासनगोट्टूवार, रवी आसवानी, संदीप आवारी, संजय कंचर्लावार, माया उईके, देवानंद वाढई, राजेंद्र अडपेवार, शितल कुळमेथे, ज्‍योती गेडाम, जिल्‍हा परिषद सदस्‍य ब्रिजभूषण पाझारे, जि.प. सदस्‍या नितू चौधरी, भाजपा चंद्रपूर तालुकाध्‍यक्ष नामदेव डाहूले आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्‍यांनी किसानों के सन्‍मान में मोदी सरकार मैदान में, स्‍थगिती रद्द करा शेतक-यांना न्‍याय द्या, महाविकास आघाडीचे पुतना मावशीचे प्रेम, कृषी विधेयकांची राज्‍यात अंमलबजावणी करा, महाविकास आघाडी नव्‍हे तर महाबिघाडी अशा घोषणांचे फलक फडकावत राज्‍य सरकारचा निषेध केला. आंदोलनानंतर डॉ. मंगेश गुलवाडे यांच्‍या नेतृत्‍वात एका शिष्‍टमंडळाने मागणीचे निवेदन जिल्‍हाधिका-यांना सादर केले. आंदोलकांच्‍या भावना शासनापर्यंत पोहचविण्‍याचे आश्‍वासन जिल्‍हाधिका-यांनी शिष्‍टमंडळाला दिले. या आंदोलनात सोशल डिस्‍टन्‍सींग चे पालन करत माया चव्‍हाण, प्रशांत विघ्‍नेश्‍वर, विनोद चौधरी, विवेक बोडे, अनिल डोंगरे, राजेंद्र खांडेकर, प्रज्‍वलंत कडू,  भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

चंद्रपूर जिल्हातील बाधीताची संख्या ४७ जिल्हयात आणखी तीन पॉझिटीव्ह

 

चंद्रपूर शहरांमध्ये तुकूम परिसरात आणखी दोन महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. बाधिताच्या संपर्कातील या दोन्ही महिला आहेत. तर ब्रह्मपुरी तालुक्यातील अड्याळ टेकडी येथील पॉझिटिव्ह बाधिताच्या संपर्कातील तळोधी खुर्द येथील आणखी एक नागरिक बाधित आढळून आला आहे. रविवारी तीन नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या ४७ झाली आहे.

जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सुमित्रा नगर, तुकुम परिसरातील प्रतिबंधित क्षेत्रातील बाधीत रुग्णाची ४७ वर्षीय पत्नी व ३० वर्षीय मुलीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. दोघींची प्रकृती स्थिर आहे.
दुसरा २० वर्षीय युवक अड्याळ टेकडी येथील बाधितांच्या संपर्कातील आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील तळोधी खुर्द येथील या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे.

चंद्रपूरमध्ये आतापर्यत २ मे ( एक बाधीत ), १३ मे ( एक बाधीत) २० मे ( एकूण १० बाधीत ) २३ मे ( एकूण ७ बाधीत ) व २४ मे ( एकूण बाधीत २ ) २५ मे ( एक बाधीत ) ३१ मे ( एक बाधीत ) २जून ( एक बाधीत ) ४ जून ( दोन बाधीत ) ५ जून ( एक बाधीत ) ६जून ( एक बाधीत ) ७ जून ( एकूण ११ बाधीत ) ९ जून ( एकूण ३ बाधीत ) १०जून ( एक बाधीत ) १३ जून ( एक बाधीत ) आणि १४ जून ( एकूण ३ बाधीत ) अशा प्रकारे जिल्हयातील कोरोना बाधीत ४७ झाले आहेत.आतापर्यत २४ बाधीत बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे ४७ पैकी अॅक्टीव्ह बाधीतांची संख्या आता २३ झाली आहे.

चंद्रपूर जिल्हात आणखी एक पॉझिटीव्ह बाधीताची संख्या पोहचली ४३ वर

चंद्रपूर शहरांमध्ये बुधवारी तुकूम परिसरातील सुमित्रा नगर भागात रहिवासी असणारे ४५ वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी आलेल्या अहवालात ४५ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यासोबतच चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधिताची संख्या ४३ झाली आहे. गेल्या आठ दिवसांपासून बाधीताला लक्षणे होती. वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात त्यांना ८ जून रोजी खासगी रुग्णालयातून दाखल करण्यात आले होते. काल ९ जून त्यांचा स्वॅब घेण्यात आला. त्यांच्या परिवारात त्यांच्यासह एकूण पाच जण असून अन्य चार सदस्यांचीही स्वॅब तपासणी केली जाणार आहे. या बाधीताची प्रवासाची कोणतीही नोंद नाही.

चंद्रपूरमध्ये आतापर्यत २ मे ( एक बाधीत ), १३ मे ( एक बाधीत) २० मे ( एकूण १० बाधीत ) २३ मे ( एकूण ७ बाधीत ) व २४ मे ( एकूण बाधीत २ ) २५ मे ( एक बाधीत ) ३१ मे ( एक बाधीत ) २जून ( एक बाधीत ) ४ जून ( दोन बाधीत ) ५ जून ( एक बाधीत ) ६जून ( एक बाधीत ) ७ जून ( एकूण ११ बाधीत ) ९ जून ( एकूण ३ बाधीत ) आणि १०जून ( एक बाधीत ) अशा प्रकारे जिल्हयातील कोरोना बाधीत ४३ झाले आहेत.आतापर्यत २३ बाधीत बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे ४३ पैकी अॅक्टीव्ह बाधीतांची संख्या आता २० झाली आहे.

मनपाची १२५३ लोकांवर कारवाई, २,५५,३४० रुपये दंड वसूल सार्वजनीक ठिकाणी थुंकणे, मास्क न वापरणे, विनापरवानगी दुकान सुरु ठेवण्याबाबत कारवाई    

चंद्रपुर १० जून  – कोरोनाच्या पार्श्वभुमीवर नियम मोडणाऱ्या १२५३ लोकांवर चंद्रपुर महानगरपालिकेच्या पथकांनी कारवाई केली असून नियमांचे पालन न करणाऱ्या नागरीकांकडून २,५५,३४० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. शहरात मास्कशिवाय फिरणार्‍या नागरिकांवर कारवाई करण्याबरोबरच सार्वजनीक ठिकाणी थुंकण्याऱ्या तसेच विनापरवानगी दुकान सुरु ठेवण्याऱ्या दुकानदारांवरही दंड ठोठावण्यात आला आहे.

कोरोनापासून बचावासाठी मास्कशिवाय घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. याबाबत शासनाकडुन स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत व त्यानुसार मनपातर्फेही मास्क लावण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र तरीही शहरात मास्क न लावता रस्त्यावर फिरणारे तसेच सार्वजनीक ठिकाणी थुंकणारे आढळून येत आहेत याशिवाय काही दुकानदार विनापरवानगी दुकान सुरु ठेवत असल्याचे आढळुन आल्याने मनपाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकार नागरीकांना घरातच राहण्याचे वारंवार आवाहन करत आहे.  चंद्रपुर शहरात प्रशासकीय स्तरावर उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, काही नागरिक मास्कशिवाय विनाकरण रस्त्यावर फिरत असल्याने तसेच सार्वजनीक ठिकाणी थुंकत असल्याने थुंकीच्या माध्यमातून कोरोनाच्या फैलावाची शक्यता आहे. अशा नागरिकांवर पोलिस कारवाईही केली जात आहे. मात्र, तरीही घराबाहेर पडण्याचे नागरिकांचे प्रमाण कमी झालेले नाही. त्यामुळे आता राज्य सरकारने पूर्वपरवानगी घेऊन घराबाहेर पडणार्‍यांनाही मास्क लावणे सक्तीचे केले आहे. त्यानुसार  शहरात मास्कशिवाय फिरणार्‍या व थुंकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

याची अंमलबजावणी २३ एप्रिलपासून  सुरू करण्यात आली असून मनपाच्या तीनही झोनमार्फत सक्तीने कारवाई करण्यात येत आहे. कारवाईदरम्यान मास्क लावण्याची समज देण्यात येऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या नागरीकांवर विशेष लक्ष देऊन कारवाई करण्यात येत आहे .
अतिक्रमण विभागाचे राहुल पंचबुद्धे, नामदेव राऊत, स्वच्छता निरीक्षक प्रदीप मडावी, उदय मैलारपवार, भूपेश गोठे,विवेक पोतनुरवार, महेंद्र हजारे, अनिरुद्ध राजुरकर, अनिल ढवळे यांच्याद्वारे सदर कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईसाठी प्रत्येक प्रभागात पथक तैनात केली आहेत.दंड करण्याची कारवाई सातत्याने सुरु राहणार असून आपल्या व इतरांच्या सुरक्षिततेसाठी मास्क लावुन ठेवण्याचे, सार्वजनीक ठिकाणी न थुंकण्याचे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

चंद्रपूर जिल्हातील बाधीताची संख्या पोहचली ४२ वर

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काल मंगळवारी रात्री आणखी तीन नागरिकांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यासोबतच जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ४२ झाली आहे. नवीन तीनही रुग्ण बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे पॉझिटिव्ह ठरले आहेत.

जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार ब्रह्मपुरी तालुक्यातील जुगनाळा गावातील ४३ वर्षीय एका बाधितांची ३३ वर्षीय पत्नी व पाच वर्षाचा मुलगा संपर्कातून पॉझिटिव्ह झाला आहे. या बाधितांना चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

अन्य एक बाधित ब्रह्मपुरी तालुक्यातील बरड किन्ही येथील २२ वर्षाचा युवक असून अड्याळ टेकडी येथील बाधीताच्या संपर्कातील आहे. संस्थात्मक अलगीकरण कक्षात असलेल्या या युवकाला उशीरा लक्षणे दिसायला लागली. त्यामुळे त्याचे स्वॅब घेण्यात आले होते.

चंद्रपूरमध्ये आतापर्यत २ मे ( एक बाधीत ), १३ मे ( एक बाधीत) २० मे ( एकूण १० बाधीत ) २३ मे ( एकूण ७ बाधीत ) व २४ मे ( एकूण बाधीत २ ) २५ मे ( एक बाधीत ) ३१ मे ( एक बाधीत ) २जून ( एक बाधीत ) ४ जून ( दोन बाधीत ) ५ जून ( एक बाधीत ) ६जून ( एक बाधीत ) ७ जून ( एकूण ११ बाधीत ) आणि ९ जून ( एकूण ३ बाधीत )अशा प्रकारे जिल्हयातील कोरोना बाधीत ४२ झाले आहेत.आतापर्यत २३ बाधीत बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे ४२ पैकी अॅक्टीव्ह बाधीतांची संख्या आता १९ आहे.

सीमावर्ती भागात नक्षल हालचाली?

जिल्ह्याच्या सीमेवर नक्षल्यांच्या हालचाली
सीमावर्ती ठाण्यांच्या बंदोबस्तात वाढ; एलसीबीतील ३१ पोलिस कर्मचाऱ्याच्या बदल्या

चंद्रपूर ता. ९ : लॉकडाउनमुळे पोलिस कर्मचाèयांवरील कामाचा ताण आधीच वाढला आहे. अशात तेलंगणा राज्याच्या सीमा परिसरात नक्षलवाद्यांच्या गुप्त हालचाली सुरू असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. नक्षल्यांच्या बिमोडासाठी पोलिस विभागाने जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात तगडा बंदोबस्त करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेतील तब्बल ३१ पोलिस कर्मचाèयांच्या तडकाफडकी बदल्या केल्या. पोलिस अधीक्षकांनी सोमवारी (ता. ८) बदलीचे आदेश काढले. गृहमंत्र्याच्या जिल्हा भेटीनंतर अवघ्या दोन दिवसांत बदल्या झाल्याने पोलिस वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

चंद्रपूर जिल्ह्याची सीमा तेलंगणा राज्याला लागून आहे. जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात विरूर स्टे., लाठी, धाबा, भारी, गोंडपिपरी, वणी कॅम्प, टेकामांडवा, जिवती, पिटीगुड्डा येथे पोलिस ठाणे, उपपोलिस ठाणे कार्यरत आहेत. उपलब्ध मनुष्यबळावर या ठाण्यांचा कारभार सुरू आहे.

अशात तेलंगणा राज्यात नक्षलवाद्यांनी गुप्त हालचाली सुरू केल्याची माहिती पोलिस विभागाला प्राप्त झाली. त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सीमावर्ती भागातील पोलिस ठाण्यांत तगडा बंदोबस्त वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सोमवारी तातडीने बदलीचे आदेश जारी करीत स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत ३१ कर्मचाèयांना संबंधित पोलिस ठाण्यांत रुजू होण्याचे निर्देश दिले आहेत.

विरूर पोलिस ठाण्यात पद्माकर भोयर, पंडित वèहाडे, महेंद्र भुजाडे, लाठी येथे रवींद्र बोरकर, सुरेश केमेकर, धनराज करकाडे, धाबा येथे राजेंद्र खनके, संजय आकुलवार, प्रकाश बल्की, भारी येथे मनोज रामटेके, अविनाश दशमवार, अनुप डांगे, प्रफुल्ल मेश्राम, मिqलद जांभुळे, अमजद पठाण, गोंडपिपरी येथे नईम खान, अमोल धंदरे, कुंदनqसग बावरी, वणी कॅम्प येथे विनोद जाधव, रवींद्र पंधरे, प्रांजल झिलपे, गजानन नागरे, जावेद सिद्दीकी, टेकामांडवा येथे संतोष बगमारे, नितीन रायपुरे, प्रशांत नागोसे, जिवती येथे गोपाल आतुलवार, संदीप मुळे, पिट्टीगुडा येथे मयूर येरणे, जमीर पठाण, मिqलद चव्हाण यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पुढील आदेशापर्यंत या कर्मचाèयांना संबंधित पोलिस ठाण्यात बंदोबस्तासाठी कायम ठेवण्यात येणार आहे.
स्थानिक गुन्हे शाखेतील कर्मचाèयांच्या बदल्या करण्यात येणार असल्याची चर्चा मागील अनेक महिन्यांपासून होती. कोरोनाच्या एन्ट्रीनंतर ही चर्चा थांबली. मात्र, आता नक्षलवाद्यांच्या गुप्त हालचाली वाढल्याचे कारण पुढे करीत एलसीबीतील तब्बल ३१ पोलिस कर्मचाèयांच्या तातडीने बदल्या करण्याचा निर्णय पोलिस अधीक्षकांनी घेतला आहे. विशेष म्हणजे, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दोन दिवसांपूर्वी जिल्ह्याला भेट दिली. त्यानंतर अचानक बदल्या करण्यात आल्याने पोलिस कर्मचारी वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना ऊत आला आहे.

एलसीबीतील अवघे चार अधिकारी
पोलिस विभागात स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) ही महत्त्वाची शाखा मानली जाते. जिल्ह्यात कुठेही कारवाई करण्याची त्यांना परवानगी असते. पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्याकडे या शाखेच्या निरीक्षकपदाचा प्रभार आहे. सहा वेगवेगळ्या पथकामाङ्र्कत शाखेचे काम सुरू आहे. मात्र, अचानक ३१ पोलिस कर्मचाèयांच्या बदल्या करण्यात आल्याने सर्व पथके रिकामी झाली. सद्यःस्थितीत कोकोटे यांच्या मदतीला गदादे, बोबडे, मुंडे ही पोलिस अधिकारी मंडळी सोबतीला आहे.

इंदिरा नगरात साडेचार लाख दारूसाठा जप्त तिघे ताब्यात ; रामनगर पोलिसांची कारवाई

चंद्रपूर : शहरातील इंदिरानगर परिसरात सोमवारी (ता. ८) रामनगर पोलिसांनी एका बुलोरा वाहनातून दीड लाखांचा दारूसाठा जप्त केला. एकूण मुद्देमालाची किमत साडेचार लाख रुपये आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली.
इंदिरानगरात एका वाहनातून दारूसाठा येत असल्याची माहिती रामनगर पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच रामनगर पोलिसांचे एक पथक इंदिरानगर परिसरात पाळत ठेवून होते. एमएच३४-१५७४ या क्रमांकाचे बुलोरो पीकअप वाहन इंदिरानगरातील माता मंदिर परिसरात आले. या वाहनावर पोलिसांना संशय आला. पोलिसांच्या पथकाने तातडीने वाहन थांबवून तपासणी केली. वाहनात देशीदारूच्या १५ पेट्या होत्या. याची किमत दीड लाख रुपये आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक ए. वाय. मलीक, सुमित खैरे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी केली.

रविवारी एकाच दिवशी ११ कोरोनाबाधीत

रविवारी एकाच दिवशी ११ कोरोनाबाधीत

बाधितांची संख्या पोहचली ३९ वर
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज रविवारी ७ जून रोजी एकाच दिवशी ११ कोरोना पॉझिटीव्ह आढळले. आता जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या ३९ झाली आहे.
गडचांदूर 1, नागभीड 4, ब्रम्हपुरी 5, शास्त्री नगर (चंद्रपूर) 1
🔸 *ऍक्टिव्ह रुग्ण : १७

लॉन तसेच नॉन एसी सभागृहांमध्‍ये लग्‍न समारंभासाठी परवानगी द्यावी- आ. सुधीर मुनगंटीवार यांची मागणी

 

लॉकडाऊन दरम्‍यान लॉन तसेच नॉन एसी सभागृहांमध्‍ये लग्‍न समारंभासाठी परवानगी द्यावी अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी शासनाकडे केली आहे.
सदर मागणी संदर्भात मुख्‍यमंत्री, मुख्‍य सचिव तसेच मुख्‍यमंत्र्यांचे प्रधान सचिव यांना त्‍यांनी ई-मेल द्वारे पत्रे पाठविली आहेत. या संदर्भात मुख्‍यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्‍याशी दुरध्‍वनी द्वारे चर्चा सुध्‍दा केली आहे.

 

या मागणी संदर्भात आपली भुमिका मांडताना त्‍यांनी म्‍हटले आहे की, कोरोना विषाणुचा राज्‍यातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सुरु असलेल्‍या लॉकडाऊन दरम्‍यान गर्दी टाळण्‍याच्‍या दृष्‍टीने केवळ 50 लोकांच्‍या मर्यादेत सोशल डिस्‍टंसिंग पाळत लग्‍न समारंभ साजरा करण्‍याची परवानगी देण्‍यात आली आहे. हे समारंभ घराच्‍या परिसरात करावे असे शासनाचे निर्देश आहेत. साधारणतः घरे लहान असतात त्‍यामुळे 50 लोकांच्‍या मर्यादेत सुध्‍दा घराच्‍या परिसरात लग्‍न समारंभ साजरे करणे अडचणीचे ठरत आहे.

त्‍यामुळे नॉन एसी सभागृह किंवा लॉनमध्‍ये लग्‍न समारंभासाठी परवानगी दिल्‍यास ते अधिक उत्‍तम ठरेल. लॉन किंवा नॉन एसी सभागृहामध्‍ये सोशल डिस्‍टंसिंगचे योग्‍य पालन सुध्‍दा करता येईल. ही बाब लक्षात घेता लॉन तसेच नॉन एसी सभागृहांमध्‍ये लग्‍न समारंभासाठी परवानगी द्यावी अशी मागणी त्‍यांनी केली आहे.

घरी किंवा परिसरात लग्‍न समारंभ साजरे होताना सोशल डि‍स्‍टंसिंगचे योग्‍यरित्‍या पालन होत नसल्‍याचे निदर्शनास आले आहे. त्‍यामुळे लॉन किंवा नॉन एसी सभागृहामध्‍ये लग्‍न समारंभ साजरे झाल्‍यास ते सुरक्षित पाऊल ठरेल असेही आ. मुनगंटीवार यांनी म्‍हटले आहे.