ऑनलाईन बोलवलेले चिकन खाल्ल्याने युवा अभियंत्याचा मृत्यू नागपूर शहरातली घटना ?

नागपूर : बदलत्या काळात माहिती तंत्रज्ञानाच्या विकासामुळे भारतीय नागरिकांची जीवनशैली आधुनिक झाली आहे. दररोजच्या वापरातील वस्तू आता घरोघरी ऑनलाईन पोहोचू लागल्या आहेत. वेळ आणि श्रम वाचविण्याच्या उद्देशाने या सेवांचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, नागपुरात एक वेगळीच घटना पुढे आली आहे.

ऑनलाईन बोलावलेले चिकन खाल्याने एका अभियंत्याचा मृत्यू झाला. ही खळबळजनक घटना लक्ष्मीनगरमधील आठरस्ता चौकात घडली. विराज नरेंद्र ताकसांडे असे मृताचे नाव आहे. या अभियंत्याचा नेमका मृत्यू कशामुळे झाला याबाबत पोलिस वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विराज ताकसांडे हा सॉफ्टवेअर अभियंता होता.

तो पत्नी पूजासोबत आठरस्ता चौकातील अभिनव अपार्टमेंटमधील पहिल्या माळ्यावरील फ्लॅट क्रमांक 202 मध्ये राहायचा. शनिवारी रात्री त्याने ऑनलाइन शेजवान चिकन बोलाविले. ते चिकन खाल्ल्यानंतर त्याची प्रकृती खालावली. तो शौचालयात गेला. तेथून बाहेर येताच तो खाली कोसळला व बेशुद्ध झाला. पूजा यांनी तातडीने पोलिसांना कळवले. माहिती मिळताच बजाजनगर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुरेश पाठक व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी विराज याला ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

राज्‍यातील सीबीएसई शाळांमध्‍ये सुध्‍दा वर्ग 1 ते 8 च्‍या विद्यार्थ्‍यांना पूढील वर्गात प्रवेश देण्‍याचा निर्णय घेणार

मानव संसाधन राज्‍यमंत्री संजय धोत्रे यांचे आ. सुधीर मुनगंटीवार यांना आश्‍वासन

सीबीएसई द्वारा संचालित राज्‍यातील शाळांमध्‍ये वर्ग 1 ते 8 च्‍या विद्यार्थ्‍यांना परिक्षा न घेता पुढील वर्गात प्रवेश देण्‍याचा निर्णय लवकरच घेण्‍यात येणार असल्‍याची माहिती भारत सरकारचे मानव संसाधन विकास राज्‍यमंत्री संजय धोत्रे यांनी दिली. माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सीबीएसई शाळांमध्‍ये शिकणा-या विद्यार्थ्‍यांच्‍या पालकांच्‍या मागणीच्‍या अनुषंगाने हा निर्णय घेण्‍याची मागणी भारत सरकारच्‍या मानव संसाधन विकास मंत्रालयाकडे केली होती.

कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्‍यातील सर्व शाळांमध्‍ये वर्ग 8 ते 10 च्‍या विद्यार्थ्‍यांच्‍या परिक्षा न घेता त्‍यांना पुढील वर्षात प्रवेश देण्‍याचा निर्णय घेतला असताना सीबीएसई शाळांनी अशा कोणत्‍याही सूचना सीबीएसई बोर्डाने दिल्‍या नसल्‍याचे सांगून यासाठी नकार दिल्‍याची बाब पालकांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या निदर्शनास आणली. आ. मुनगंटीवार यांनी त्‍वरीत मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल व राज्‍यमंत्री संजय धोत्रे यांना ईमेल द्वारे पत्र पाठवून सीबीएसई शाळांना स्‍पष्‍ट निर्देश देण्‍याची विनंती केली. संजय धोत्रे यांच्‍याशी आ. मुनगंटीवार यांनी दूरध्‍वनीद्वारे चर्चा केली असता सीबीएसई द्वारा संचालित राज्‍यातील शाळांमध्‍ये वर्ग 1 ते 8 च्‍या विद्यार्थ्‍यांना परिक्षा न घेता पुढील वर्गात प्रवेश देण्‍याचा निर्णय लवकरच घेण्‍यात येईल अशी माहिती आ. मुनगंटीवार यांना दिली आहे.

राज्‍यातील सीबीएसई शाळांमध्‍ये शिकणा-या विद्यार्थ्‍यांच्‍या पालकांनी याची नोंद घेण्‍याचे आवाहन आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

चंद्रपूर शहर पोलिस स्टेशन गुन्हे पथकाने कलदार चोट्याच्या मुसक्या आवळल्या मुद्देमालासह केली अटक !

कोरोना संचारबंदीचा फायदा घेवून आता चोर सक्रिय झाले असून बंद असकेले दुकाने त्यांचे प्रमुख लक्ष बनले आहे. दिनांक 31/03/20 रोजी पोलिस स्टेशन चंद्रपूर शहर येथे फिर्यादी अब्दुल रज्जाक अली मोहम्मद सुराया रा रहमत नगर चंद्रपूर यांनी तक्रार दिली की बागला चौक चंद्रपूर येथील त्यांच्या कन्फेश्नरी दुकानाला रोज प्रमाणे पाहणी केली असता त्यांच्या दुकानाचे लाकडी दरवाजाचे पल्ले व ताले तुटलेले दिसले व दुकानातील 10, 5, 2, 1 चे कलदार असे एकूण 23650/- रू नगदी कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेले, त्यांच्या या रिपोर्ट वरून पो स्टे ला अपराध क्रमांक 243/20 कलम 461, 380 भा द वी चा गुन्हा नोंद करण्यात आला आणि पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी रवाना होवून आरोपीचा शोध सुरू केला.त्यासाठी प्रथम पोलिस स्टेशन च्या रेकॉर्ड वरील गुन्हेगार चेक करीत असताना महावीर नगर भिवापूर वार्डातील संशयीत आरोपीचा शोध घेवून विचारपूस केली असता त्यांनीच सदर गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांना पोलिस स्टेशनला आणून करवाई केली ते दोन आरोपी संदीप मनोहर चौधरी वय २४ वर्ष, इरफान सरवर शेख वय २२ वर्ष, व तनवीर कादीर बेग वय १९ वर्ष सर्व रा महावीर नगर भिवापूर वार्ड चंद्रपूर यांना अटक करण्यात आली. या गुन्ह्याचा तपास पोलिस स्टेशन चंद्रपूर शहर चे गुन्हे शोध पथकातील कर्मचारी पो उप नि सुशील कोडपे, ASI बाबा डोमकावळे, पो.हवा. वंदीराम पाल, किशोर तुमराम, विलास निकोडे, स्वामीदास चालेकर, महेंद्र बेसरकर, सिद्धार्थ रंगारी, ना पो का. पांडुरंग वाघमोडे, पो का. प्रमोद डोंगरे, मंगेश गायकवाड, सचिन बुटले, पंकज शिंदे यांनी करून हा गुन्हा उघडकीस आणला असून सदर गुन्हा 5 तासाचे आत उघडकीस आणल्याने शहर गुन्हे शोध पथकाचे उपपोलिस निरीक्षक सुशील कोडापे व त्यांच्या सहकारी पोलिस कर्मचाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

सर्व शाळांची पुढील तीन महिन्याची फी माफ करावी व सन २०१९-२०२० व २०२०-२०२१ ची शाळा,

महाविद्यालय येथील फी जमा करण्याची मुदत वाढवून द्यावी .मनसेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

देशातील कोरोना आजाराच्या फैलावामुळे सर्वत्र लोक डॉन जाहीर करण्यात आले आहे. तसेच शासनाद्वारे संपूर्ण राज्यात दिनांक १४ एप्रिल २०२० पर्यंत बंदी लागू करण्यात आल्याने, सर्व नागरिकांना घरामध्येच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.कोरोना मूळे लोक डॉन मध्ये पुढे वाढ होणेसुध्दा नाकारता येत नाही,तसेच कोविड-१९ कोरोना या आजाराचे संक्रमण रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवा सोडल्यास सर्व दुकाने व व्यवसाय बंद असल्याने, सर्व मध्यमवर्गीय व गरीब कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले आहे.

राज्यातील सध्याची परिस्थिती व संपूर्ण बंदी मुळे पैश्याची उपलब्धता नसल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या पालकांना दिलासा मिळावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना द्वारे चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले आहे, या बंदीच्या कालावधीमध्ये सर्व शासकीय, खाजगी शाळा तसेच सर्व महाविद्यालय यांनी पालका कडून मार्च, एप्रिल व मे महिन्याची सरसकट फी माफ करावी व ज्या पालकांनी अद्याप खाजगी शाळा व महाविद्यालयांची सन २०१९-२०२० व सन २०२०-२०२१ या चालू वर्षाची फी जमा केलेली नाही अश्या पालकांना फी जमा करण्याकरिता पुढील सहा महिने मुदतवाढ देण्यात यावी तसेच पुढील सहा महिने सदर फी जमा करण्याकरिता व्यवस्थापन किंवा शाळांकडून सक्ती करण्यात येऊ नये याबाबत निर्देश काढावेत व तशी तक्रार आल्यास आपण कारवाई करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी या निवेदान्द्वारे करण्यात आली आहे.
या बंदीच्या काळात हा निर्देश शासनाने काढल्यास आर्थिक अडचणीत सापडलेला पालकांना दिलासा मिळणार असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार व तालुकाध्यक्ष विवेक धोटे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर करून त्वरित निर्णय घेण्याची विनंती केली आहे.

पोलिसांना सानीटायझर व हँडवॉशचे मोफत वाटप !

ब्रम्हपुरी उपविभागीय पोलिस अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या पत्नी डॉ.प्राची मिलिंद शिंदे यांनी बनविले घरीच प्रॉडक्ट, त्यांच्या कार्याची पोलिस अधिक्षक रेड्डी यांनी केली प्रशंसा ! शुधा क्लीनसिंग सोल्यूशन्स (सानीटायझर) नाव देवून आणले प्रॉडक्ट समोर,

आपले पती बाहेर जाते ते आपले कर्तव्यावर मात्र कोरोना विरोधात आता जणू युद्ध सुरू आहे आणि या युद्धात आपल्याला जिंकायचे आहे त्यामुळेच मी आपल्या पतीसह पोलिस कर्मचाऱ्यांची कोरोना व्हायरस पासून सुरक्षा व्हावी म्हणून सानीटायझर आणि हँड वॉश घरीच तयार करून ते आपल्या पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांना मोफत देत आहे”

अशी प्रतिक्रिया ब्रम्हपुरी विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या धर्मपत्नी सौ. डॉ. प्राची शिंदे यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक मोहेश्वर रेड्डी यांनी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत दिली. त्यांच्या या कार्याची जिल्हा पोलिस अधिक्षक रेड्डी यांनी प्रशंसा केली असून अशा प्रकारचा उपक्रम समाजातील इतर घटकांनी राबविल्यास आपण कोरोना व्हायरस विरोधातील लढाईत नक्कीच जिंकू असा विश्वास व्यक्त केला आहे. या प्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी मिलिंद शिंदे, त्यांच्या पत्नी डॉ. प्राची शिंदे. उपविभागीय पोलिस अधिकारी देशमुख व इतर पोलिस अधिकारी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

दारूबंदी समीक्षा दुसरी बैठक पार पडली

जिल्ह्यातील दारूबंदी समीक्षा करण्यासाठी गठित समितीची दुसरी बैठक आज दिनांक 11 फेब्रुवारी रोजी पार पडली. या संदर्भातील पहिली बैठक पाच फेब्रुवारी रोजी घेण्यात आली होती.

जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सागर डोमकर आजच्या बैठकीला उपस्थित होते.

दारूबंदी समीक्षा समिती संदर्भातील काही निर्णय

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री विजय वडेट्टीवार यांनी दिलेल्या दिनांक 27 जानेवारी रोजीच्या पत्रानुसार ही समिती गठीत करण्यात आली आहे.

राज्य शासनाने एप्रिल 2015 पासून जिल्ह्यामध्ये दारूबंदीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला दारूबंदी बाबतच्या निर्णयाबाबत भिन्न मते मतांतरे असून यासंदर्भात पालकमंत्री महोदयाकडे लेखी व तोंडी निवेदने प्राप्त झाली आहेत.

दारूबंदी लागू झाल्यानंतर या निर्णयाचा जिल्ह्यातील विविध क्षेत्रावर बाबींवर झालेल्या परिणामाची बदलाची समीक्षा करण्याकरिता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित विभागाच्या जिल्हाप्रमुख यांची एक समिती स्थापन करून त्याचा लेखी अहवाल सादर करण्याचे पालकमंत्री महोदयांनी निर्देशीत केले आहे.

ही समिती जिल्हास्तरीय समिती असून पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार केवळ या विषयाची समीक्षा करण्यासाठी तयार झालेली आहे.

या समितीमध्ये जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, महानगर पालिका चंद्रपूरचे आयुक्त संजय काकडे, जिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोड, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सागर डोमकर यांचा समावेश आहे.

या समितीच्या मार्फत जिल्हाभरातून व्यक्तिगत तसेच नोंदणीकृत संस्थांकडून दारूबंदी संदर्भात लेखी निवेदने मागण्यात येणार आहे.

ही समिती दारूबंदीच्या निर्णयानंतर गेल्या पाच वर्षात जिल्ह्यात झालेल्या सामाजिक,आर्थिक ,आरोग्य, पर्यटन, उद्योग,व्यवसाय क्षेत्रावर झालेला परिणाम. उत्पादन शुल्क विभागाच्या महसूल संदर्भातील आकडेवारी व संबंधित विभागाचे निरीक्षणे आपल्या अहवालात सादर करेल.

ही समीक्षा समिती असून केवळ वस्तुनिष्ठ आकडेवारी व निरीक्षणे सादर करणार आहे. त्यामुळे या समितीमध्ये कोणत्याही गैर शासकीय सदस्याचा समावेश नाही.

या समितीची स्थापना झाल्यानंतर गेल्या आठवडाभरात या समितीच्या दोन बैठकी आतापर्यंत झाल्या आहेत.५ फेब्रुवारी व ११ फेब्रुवारीला या बैठकी घेण्यात आल्या.

10 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी या दरम्यान जिल्ह्यातील सामान्य नागरिक नोंदणीकृत संस्था आपल्या अभीप्रायाला लेखी स्वरूपात
राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक कार्यालय, घुटकाळा वार्ड, नेहरू शाळेजवळ, चंद्रपूर ४४२४०१
supspchanda@gmail.com
या पत्त्यावर किंवा वरील ई-मेलवर पाठवू शकतील.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रमुखांना अर्थात महानगरपालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ,नगर परिषद व नगर पंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांकडे सर्व व स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी व सदस्य आपल्या लेखी प्रतिक्रिया सादर करणार आहेत.

सर्वसामान्य नागरिकांसोबतच माध्यमांमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांना देखील आपल्या लेखी सूचना वरील पत्त्यावर मांडता येणार आहे.

25 फेब्रुवारी पर्यंत जिल्हाभरातील येणाऱ्या या लेखी सूचना अभिप्राय हे गोपनीय ठेवण्यात येतील. सूचना करणाऱ्यांचे नाव सार्वजनिकरीत्या जाहीर करण्यात येणार नाही. त्यामुळे या विषयासंदर्भात प्रत्येकाने आपले मत मत मांडावेत ,असे आवाहन करण्यात येत आहे.

मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वातील ही समिती आपला अहवाल पालकमंत्री यांच्याकडे सादर करणार आहे.

या अहवालासंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार शासनाला असेल या समितीमार्फत कोणतेही निष्कर्ष देण्यात येणार नसून ही केवळ समीक्षा समिती आहे.

जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वातील ही समिती असल्यामुळे या समितीच्या कक्षेत जिल्ह्यातीलच सूचना व अभिप्राय घेण्यात येणार आहेत.

कुख्यात गॅंगस्टर एजाज लकडावाला अखेर सापडला, मुंबई पोलिसांना मोठं यश

मुंबई पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा हस्तक, कुख्यात गॅंगस्टर एजाज लकडावालाला . कुख्यात गॅंगस्टर एजाज लकडावाला. मुंबई गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. बिहारच्या पाटण्यातून एजाज लकडावालाला पकडण्यात आलं. पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केलं असता, कोर्टाने त्याला 21 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. . कुख्यात गॅंगस्टर एजाज लकडावाल

एजाज लकडावालाच्या मुलीला काही दिवसांपूर्वी मुंबई विमानतळावर अटक केली होती. ती बोगस पासपोर्टवर देश सोडून जात होती. तिला अटक केल्यानंतर तिच्याकडे केलेल्या तपासात एजाज लकडावालाची माहिती उघड झाली होती.एजाज लकडावालावर जवळपास 25 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. एजाज लकडावाला हा दाऊदचा अत्यंत जवळचा सहकारी होता. मात्र दाऊदसोबतच्या वादानंतर तो गँगस्टर छोटा राजनच्या टोळीत गेला होता. मुंबईत झालेल्या अनेक गुन्ह्यांमध्ये लकडावालाचा सहभाग होता. वर्ष 2003 मध्ये एजाज लकडावालाचा मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती. मात्र तो बँकॉकवरुन कॅनडाला पळून गेला होता. गेल्या अनेक वर्षांपासून तो तिथेच होता. लकडावालाने छोटा राजनशी हातमिळवणी केल्याने दाऊद नाराज असल्याची चर्चा होती.दरम्यान, यापूर्वी पोलिसांनी लकडावालाची मुलगी सोनिया लकडावाला उर्फ सोनिया शेखला शुक्रवारी रात्री मुंबई विमानतळावरुन अटक केली होती. सोनिया बनावट पासपोर्टच्या आधारे नेपाळला जाण्याच्या तयारीत होती. त्यावेळी पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन एजाज लकडावालाची माहिती मिळवली.

एजाज हा छोटा राजन गॅंगमध्ये होता. त्यापूर्वी तो दाऊद गॅंगमध्ये होता. छोटा राजनवर हल्ला झाल्यानंतर तो छोट राजन गॅंगमधून वेगळा झाला होता. त्याच्याविरोधात 27 गुन्हे दाखल आहेत.शिवाय सुमारे 80 तक्रारी आहेत. देशाच्या विविध राज्यातही लकडावालाविरोधात गुन्हे दाखल आहेत.

मुंबई पोलीस अनेक महिन्यांपासून शोध घेत होते. त्याच्या मुलीला 28 डिसेंबर रोजी अटक केली होती. ती सोनिया मनीष अडवाणी या बोगस नावाने पासपोर्ट बनवून नेपाळला निघाली होती. त्यावेळी तिला मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली. त्याच्या मुलीला अटक केल्यावर पोलिसांना एजाज लकडावालाविरोधात अनेक माहिती मिळाली.

एजाज लकडावाला हा 8 जानेवारी 2020 रोजी बिहारमध्ये येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तयारी केली होती. पोलिसांनी बिहारमधीळ पाटण्यातील जनकपूर इथे लकडावालाला अलगद पकडला. काल रात्री त्याला मुंबईत आणून अटकेची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

सर्व नाट्यमय घडामोडींनंतर आजच्या ‘सामना’तून भाजपवर जोरदार टीकास्त्र !

        लक्षवेधी

महाराष्ट्रातील संपूर्ण सत्तापेचात शिवसेनेची परखड भूमिका बजावणारे शिवसेना नेते संजय राऊत काल झालेल्या राजकीय भूकंपावर आजच्या ‘सामना’मध्ये काय लिहितात याकडे सर्वांच लक्ष लागलं होतं. संजय राऊत यांनी काल झालेल्या राजकीय नाट्यावर भाजपचा जोरदार समाचार घेतला आहे. तसेच कालचा दिवस महाराष्ट्रातील राजकारणातला काळा दिवस असल्याचं म्हटलं आहे.

पुरोगामी महाराष्ट्राच्या राजकारणात शनिवार 23 नोव्हेंबर 2019 हा दिवस ‘काळा दिवस’च म्हणून नोंदवला जाईल. भाजपने 22 तारखेला रात्रीच्या अंधारात गुपचूप हालचाली करून पहाटे मुख्यमंत्र्यांचा शपथविधी उरकला, अशा शब्दात संजय राऊत यांनी अग्रलेखाच्या माध्यमातून भाजपवर टीकेचा बाण सोडला आहे.

अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा असा विश्वासघात केलेला असतानाच राज्यभरात संतापाची लाट उसळली. अजितदादांसोबत गेलेले अनेक आमदारही सायंकाळपर्यंत स्वगृही परतले आणि अवघ्या 12 तासांतच अजितदादांच्या बंडाचे पुरते 12 वाजले, असं सामनामध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर शिवसेनेनं भाजपवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यास सुरूवात केली आहे.

मुख्यमंत्री यांनी घेतली राज्यपाल यांची सदिच्छा भेट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची सदिच्छा भेट

मुंबई, दि. 28 : – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राजभवन येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यपाल श्री. कोश्यारी यांना दिवाळीनिमित्त शुभेच्छा दिल्या आणि राज्यातील सद्यस्थितीची माहिती दिली.

अवैधरित्या मद्यपुरवठा करणाऱ्या मुंबईतील ६ परवानाधारकांचा परवाना रद्द

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त प्राजक्ता लवंगारे – वर्मा यांची माहिती

मुंबई : विधानसभा निवडणुका निर्भीड व खुल्या वातावरणात पार पडण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत मुंबईमध्ये नियमभंग करणाऱ्या काही परवानाधारकांवर कडक कारवाई करण्यात आली. ६ परवानाधारकांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. यापुढेही अवैधरित्या मद्यपुरवठा करणाऱ्या अथवा नियमभंग करणाऱ्या अनुज्ञप्तींविरोधात अनुज्ञप्‍ती रद्द अथवा निलंबनाची कठोर कारवाई करण्याचा इशारा राज्य उत्पादन शुल्क आयुक्त प्राजक्ता लवंगारे – वर्मा यांनी दिला आहे. सर्व राज्य उत्पादन शुल्क अधिकारी व कर्मचारी यांना याबाबत सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

निवडणूक आचारसंहिता नियमांचा तसेच मुंबई विदेशी मद्य नियमावली 1953 अंतर्गत नियमांचा भंग करणाऱ्या व अवैधरित्या मद्यविक्री करणाऱ्या मुंबई उपनगर जिल्ह्यातील वैशाली वाईन्सव्हरायटी वाईन्स या एफएल-II अनुज्ञप्तीविरुध्द कठोर पाउले उचलून या अनुज्ञप्ती रद्द करण्यात आल्या आहेत. अवैधरित्या मद्यपुरवठा करणाऱ्या वैशाली वाईन्स या अनुज्ञप्तीसोबत अवैध मद्याचा पुरवठा होणाऱ्या हॉटेल किनारा या एफएल-III अनुज्ञप्तीचाही परवाना रद्द करण्यात आला आहे. तसेच मुंबई विदेशी मद्य नियमावली 1953 अंतर्गत अटी व शर्थींचे पालन न करणाऱ्या शशी लंच होमहॉटेल स्वस्तिक या एफएल-III अनुज्ञप्ती निवडणूक कालावधी संपेपर्यंत निलंबित करण्यात आल्या आहेत. 24 लाँज बारप्लॅटिनम बारशिवलीला बारजरना हॉटेल एफएल – III अनुज्ञप्ती ह्या 08 ते 15 दिवसांकरिता निलंबित करण्यात आल्या आहेत. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांच्या आदेशान्वये मुंबई उपनगर जिल्ह्याच्या अधीक्षक स्नेहलता श्रीकरनिरीक्षक मनोज चौधरी यांच्यामार्फत ही कार्यवाही करण्यात आली.

निवडणूकीदरम्यान जिल्ह्यात अनुचित प्रकार घडू नये यासाठी एफएल-II, एफएल-III व सीएल –III इ. मद्यविक्री करणाऱ्या अनुज्ञप्तींवर सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ऑनलाईन पध्दतीने मद्यविक्रीची माहिती भरणेविहीत वेळेत मद्य अनुज्ञप्ती उघडणे व बंद करण्याच्या वेळा कसोशिने पाळणेमद्य विक्रीच्या नोंदवह्या व मद्यसाठा अद्यावत ठेवणे याबाबत जिल्ह्यातील सर्व अनुज्ञप्तीधारकांस निर्देश देण्यात आलेले आहेत.