रविवारी एकाच दिवशी ११ कोरोनाबाधीत

रविवारी एकाच दिवशी ११ कोरोनाबाधीत

बाधितांची संख्या पोहचली ३९ वर
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज रविवारी ७ जून रोजी एकाच दिवशी ११ कोरोना पॉझिटीव्ह आढळले. आता जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या ३९ झाली आहे.
गडचांदूर 1, नागभीड 4, ब्रम्हपुरी 5, शास्त्री नगर (चंद्रपूर) 1
🔸 *ऍक्टिव्ह रुग्ण : १७

चेक पोस्ट वरुन विनापरवाना कोणालाही आत सोडू नका :जिल्हा कोरोना मुक्त ठेवा ; ना. विजय वडेट्टीवार

वैद्यकीय तपासणी इतकीच नाकाबंदी ही जबाबदारीची मोहिम
अन्नधान्य वाटपामध्ये जिल्ह्यात समाधानकारक काम
शेल्टर होम मधील नागरिकांनी दूरध्वनी संवाद साधावा
अन्य जिल्ह्यातील जिल्हावासियांनी जिल्ह्यात येण्याचा प्रयत्न करू नये

शेतीच्या सर्व कामांना शारीरिक अंतर ठेवून सुरू ठेवा
अजान देतांना मशिदीमध्ये ५ पेक्षा अधिक व्यक्ती नको
केशरी कार्ड धारकांनी धान्याची उचल तत्पर करावी
लॉक डाऊन 3 मेपर्यंत कायम असून बाहेर पडू नये
विद्यार्थ्यांना आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत आहे

आयुक्त राजेश मोहिते यांच्या नेतृत्वात चंद्रपूर महानगरपालिकेने पास वितरणाचा एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे

ज्याची अंमलबजावणी येत्या काही दिवसांत होणार आहे. ह्या नुसार जीवनावश्यक वस्तू आणि अत्यावश्यक कामासाठी घरातील एकाच सदस्य बाहेर पडण्याची मुभा आहे.चंद्रपूर पॅटर्न’ मध्ये शहरातील प्रत्येक घरात एका विशिष्ट पासचे वितरण केले जात आहे. त्यात वॉर्डचे नाव, बाहेर पडण्याचा दिवस (उदा. सोमवार, मंगळवार), बाहेर पडणाऱ्या दोन व्यक्तींची नावे याचा उल्लेख असतो. एक व्यक्ती काही कारणास्तव बाहेर पडू न शकल्यास दुसऱ्या सदस्याचा विकल्प म्हणून दोन नावे. ही माहिती भरून झाली की पास वापरण्यास तयार होतो. सोमवार ते शनिवार अशा प्रकारचे सहा पास तयार करण्यात आले आहे. शहरात एकूण 17 प्रभाग आहेत ज्यामध्ये 85 हजार घरांचा समावेश आहे. आशावर्करच्या माध्यमातून हे पासेस घरोघरी जाऊन वितरित केले जात आहेत. हे काम आता अंतिम टप्प्यात आहे. यानंतर प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला आठवड्यातून एकदाच बाहेर पडता येणार आहे. त्यातही आपल्या प्रभागातील दुकाने किंवा बाजारातुनच त्याला वस्तू खरेदी कराव्या लागणार आहे. असा व्यक्ती दुसऱ्या प्रभागात दिसला तर त्याच्यावर कारवाई होईल. उदाहरणार्थ सोमवारी पांढऱ्या रंगाचे कार्ड आहे. म्हणजे या दिवशी ज्यांच्याकडे पांढरे कार्ड आहे असेच लोक घराबाहेर पडू शकणार आहे. त्यामुळं जीवनावश्यक वस्तूसाठी बाहेर गर्दी होणार नाही. प्रत्येक वॉर्डात काही मोजकेच लोक बाहेर दिसतील. यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळता येणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर ‘चंद्रपूर पॅटर्न’ संपूर्ण देशासाठी एक आदर्श उपक्रम ठरणार आहे.

संभाजी ब्रिगेड च्या वतीने चक्क चुलीवर स्वयंपाक करून भोजनदान

युवकांचा अनोखा उपक्रम जंगलातून  इंधन आणून सुरू केले गरजूना  भोजनदान .चक्क सिलेंडरचा पैसा वाचून तेच पैसे गोरगरिबांच्या किराणा, धान्य, भाजीपा ला व या वस्तू व
लागन म्हणून चक्क चुलीवर स्वयंपाक करून भोजनदान ६ दिवसापासून ही भोजनाची व्यवस्था सुरू केली आहे. संभाजी ब्रिगेड च्या वतीने .चंद्रपूर.

संपूर्ण देशात २१ मार्च पासून लॉकडाऊनचा सुरू आहे. अश्यात सर्व रोजंदारी करणाऱ्यांचे खूपच हाल होत आहे. इंदिरानगर, श्यामनागर, राजीव गांधी नगर येथे खूप मोठ्याप्रमाणात रोजंदारी करणारे लोक राहतात त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली. शासनाने धान्यसाठा दिला पण चुलीला लागणारे साहित्य. भाजीपाला, किराणा सामान, गॅस हे खरेदिकरिता लागणारे पैसे नसल्यामुळे अनेक लोकांच्या चुली बंद पडल्या होत्या त्यांना जेवणाची मदत व्हावी याउद्देशाने संभाजी ब्रिगेड तर्फे किचन सुरू करून जेवण देण्यात येत आहे.

ही किचन ६ एप्रिल पासून सुरु करण्यात आली. स्थानिक युवकांनी आणि दानशूर व्यक्तींनी किराणा, धान्य, भाजीपा ला व या वस्तू चे सहकार्य केले व त्यातून ही किचन उभी राहिली व सतत ६ दिवसापासून ही भोजनाची व्यवस्था सुरू केली आहे.

इंदिरानगर वार्डातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे लोकांच्या सहकार्याने ही किचन सुरू आहे. खेड्यापाड्यात फिरून येथील युवकांनी चेकनिंबा ला, शेणगाव, सोनेगाव, मोरवा या गावातून धान्य गोळा करून धान्य गोळा केले आणि ही किचन सुरू केली. किचन च्या माध्यमातून आतापर्यंत ४००० लोकांना

भोजन सेवा देण्यात आली. आणि ही किचन ३० एप्रिल पर्यंत सुरू ठेण्याचा माणस कार्यकर्त्यांनी बोलून दाखवला. किचन ला वार्डातील अनेक महिला, युवक स्वाईच्छेने पुढे येवून सहकार्य करीत आहे. या मध्ये पदाधिकारी विनोद थेरे,  , प्रदीप सोनुलकर,जगदीश मुळे, आशिष तेलंग, गोमदेव थेरे, शादिक शेख, प्रदीप वाटेकर,

तसेच अनेक युवक, महिला आणि दानशूर लोकांचे सहकार्य पैसा, धान्य, वेळ लोक देत आहे. या कृती ची चर्चा वार्ड तसेच शहरात सुरू आहे. येथील युवकांनी खर्च कमी व्हावा यामुळे जंगलात जावून जळावू लाकूड चुली करिता युवकांनी आणले हे सारे कार्य युवक स्वखुशने करीत आहे.हे पुण्य काम आहे अश्याप्रकारची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. लोक गरीब आहेत पण स्वाभिमानी आहेत त्यामुळे त्यांना सहकार्य करणे ही आपली जबाबदरी आहे हा एकमेव उद्देश ठेवून भोजनाची व्यवस्था. सुरु आहे

जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या संकल्पनेतून सॅनिटायझर व्हॅन केली तयार

पोलिसांच्या निर्जंतुकीकरणासाठी पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या संकल्पनेतून सॅनिटायझर व्हॅन तयार

संचारबदीत सर्वाधिक महत्वाची भूमिका पोलिस बजावत आहे.शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. ठाणे आणि नाकाबंदी अशा दोन स्तरावर पोलिसांचे काम सुरू आहे.या दरम्यान त्यांचा हजारो लोकांशी संपर्क येतो.मात्र या कर्मचाऱ्यांना निर्जंतुकीकरण करण्याचे प्रभावी साधन आतापर्यंत उपलब्ध नव्हते.त्यांना पारंपरिक पद्धतीचाच वापर करावा लागत होता.आता मात्र जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या संकल्पनेतून सॅनिटायझर व्हॅन तयार केली आहे.बंदोबस्त आणि कर्तव्यावर असलेला प्रत्येक पोलिसांचे निजंर्तुकीकरण यामुळे होणार आहे.सध्या कोरानाच्या वादळाने सारेच हादरले आहे. त्यांचा संसर्ग थांबविण्यासाठी मसोशल डिस्टन्सिंगम हाच एकमेव प्रभावी उपाय आहे. मात्र नागरिकांनी सामाजिक अंतर ठेवावे,यासाठी दिवस रात्र पोलिस प्रयत्न करीत आहे. मात्र हे करताना अनेकदा त्यांचा नागरिकांनी थेट संबंध येतो.विशेषतः बंदोबस्त असलेले आणि ठाण्यात कार्यरत पोलिसांना सोशल डिस्टन्सिंगम पाळणे कठीण होत आहे. यापाश्र्वभूमीवर त्यांना कोरानाची लागण होण्याची भीती सतावत असते.मात्र आता जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यावर वेग़ळा तोडगा काढला. त्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या संकल्पनेतून सॅनिटायाझर व्हॅन तयार केली आहे.ही व्हॅन जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातून सर्व पोलिस ठाणे आणि नाकाबंदी असलेल्या ठिकाणी जाते.तेथील पोलिस कर्मचारी व्हॅनमध्ये एक एकटे जातात. या व्हॅन मध्ये निर्जंतुकीकरण करण्यासाठी फवारे लावले आहे.विशिष्ट प्रकारचे रासायनिक द्रव्य या फवाऱ्यातून सोडले जाते. पोलिस कर्मचारी आता गेला की व्हॅनमधील कर्मचारी बटन सुरू करतो. त्यानंतर फवारे सुरू होतात आणि आतील कर्मचाऱ्यांच्या अंगावर पडतात. अशा तर्हेने डोक्यापासून तर पायापर्यंत त्या कर्मचाऱ्यांचे निर्जंतुकीकरण केले जाते. राज्यातील हा पहिलाच प्रयोग असल्याचे बोलले जात आहे.

अजयपुर गावात तेरवीच्या जेवणातून विषबाधा झाल्याने 40 व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आले

चंद्रपूर शहरालगत मूल मार्गावर अजयपूर येथे अन्नातून विषबाधा, एका घरी तेरवीच्या जेवणाचे गावाला होते निमंत्रण, सकाळी झालेल्या जेवणानंतर सुमारे 40 व्यक्तींना मळमळ- उलट्या, जवळच्या चिचपल्ली येथील प्रा. आ. केंद्रात आणले गेले बाधित लोक, डॉक्टर-परिचारिका करत आहेत शर्थीचे प्रयत्न, काहींना चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात केले जात आहे रवाना

राज्य देशावर कोरोनाचे संकट घोंगावत असताना ग्रामीण भागात यातून कुठलाही बोध घेतला जात नसल्याचे चित्र चंद्रपूर जिल्ह्यात पुढे आले आहे. चंद्रपूर शहरालगत मूल मार्गावरच्या अजयपुर गावात तेरवीच्या जेवणातून विषबाधा झाल्याने 40 व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सकाळी अजयपुर येथील पोलिस पाटलाच्या घरी हे तेरवीचे जेवण होते. यासाठी गावाला निमंत्रण देण्यात आले होते. मात्र दुपारपासून जेवण केलेल्या लोकांना मळमळ उलट्या व तापाचा त्रास सुरू झाला. रूग्ण वाढल्याने जवळच्या चिचपल्ली प्राथमिक आरोग्य केंद्रात काही लोक हलवण्यात आले. तर रात्री उशिरापर्यंत रुग्णांची आरोग्य केंद्रातील भरती सुरूच असल्याने काहींना चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलविले जात असल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान देश लॉकडाऊन असताना सामाजिक दूरता पाळायची आहे. धार्मिक विधी -कार्यक्रम यावर बंदी असताना कायद्याचे पालन करण्याची जबाबदारी असलेल्या पोलिस पाटलाच्या घरीच हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान चिचपल्ली येथे डॉक्टरांचे चमू रवाना झाली असून स्थानिक परिचारिका व डॉक्टर या रुग्णांवर उपचार करत आहेत.

चंद्रपूरातील डॉ.विनोद नगराळे यांच्या विरोधात मनपाच्या अरोग्य अधिकारी डाँ खेरा यांची तक्रार – शहर पोलिसांत गुन्हा दाखल

कोरोनाशी दोन हात सुरू असताना खासगी रुग्णालयात उपचारासाठी येणाईया संशयित रुग्णांची माहिती प्रशासनाला देणे बंधनकारक आहे. मात्र, येथील डॉ. विनोद नगराळे यांनी प्रशासनाला कोणतीही सूचना न देता रुग्णावर उपचार केला आणि परस्पर सुटी दिली. . याप्रकरणी महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डाँ खेरा यांचा तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संपूर्ण जगात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. देशात दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लाकडाऊन करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या वतीने मोठी खबरदारी घेतली जात आहे. शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी येणाईया रुग्णांची माहिती प्रशासनाला देणे बंधनकारक केले आहे. अन्यथा कारवाई करण्याचा इशारासुद्धा दिला होता.

डॉ. नगराळे यांच्याकडे रहेमतनगर येथील रुग्ण उपचारासाठी दाखल झाला. या रुग्णावर उपचार करून सुटका करण्यात आली. त्यानंतर काही दिवसात त्या रुग्णाचा मृत्यू झाला. मृत्यूच्या घटनेनंतर डॉ. नगराळे यांनी संबंधित रुग्णाची माहिती प्रशासनाला दिली नसल्याचे समोर आले. महानगरपालिका प्रशासनाने या प्रकाराची गंभीरतेने दखल घेतली. वैद्यकीय अधिकाèयांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून भादंवि १८८ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बहादुरे यांनी दिली

सर्व शाळांची पुढील तीन महिन्याची फी माफ करावी व सन २०१९-२०२० व २०२०-२०२१ ची शाळा,

महाविद्यालय येथील फी जमा करण्याची मुदत वाढवून द्यावी .मनसेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

देशातील कोरोना आजाराच्या फैलावामुळे सर्वत्र लोक डॉन जाहीर करण्यात आले आहे. तसेच शासनाद्वारे संपूर्ण राज्यात दिनांक १४ एप्रिल २०२० पर्यंत बंदी लागू करण्यात आल्याने, सर्व नागरिकांना घरामध्येच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.कोरोना मूळे लोक डॉन मध्ये पुढे वाढ होणेसुध्दा नाकारता येत नाही,तसेच कोविड-१९ कोरोना या आजाराचे संक्रमण रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवा सोडल्यास सर्व दुकाने व व्यवसाय बंद असल्याने, सर्व मध्यमवर्गीय व गरीब कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले आहे.

राज्यातील सध्याची परिस्थिती व संपूर्ण बंदी मुळे पैश्याची उपलब्धता नसल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या पालकांना दिलासा मिळावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना द्वारे चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले आहे, या बंदीच्या कालावधीमध्ये सर्व शासकीय, खाजगी शाळा तसेच सर्व महाविद्यालय यांनी पालका कडून मार्च, एप्रिल व मे महिन्याची सरसकट फी माफ करावी व ज्या पालकांनी अद्याप खाजगी शाळा व महाविद्यालयांची सन २०१९-२०२० व सन २०२०-२०२१ या चालू वर्षाची फी जमा केलेली नाही अश्या पालकांना फी जमा करण्याकरिता पुढील सहा महिने मुदतवाढ देण्यात यावी तसेच पुढील सहा महिने सदर फी जमा करण्याकरिता व्यवस्थापन किंवा शाळांकडून सक्ती करण्यात येऊ नये याबाबत निर्देश काढावेत व तशी तक्रार आल्यास आपण कारवाई करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी या निवेदान्द्वारे करण्यात आली आहे.
या बंदीच्या काळात हा निर्देश शासनाने काढल्यास आर्थिक अडचणीत सापडलेला पालकांना दिलासा मिळणार असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार व तालुकाध्यक्ष विवेक धोटे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर करून त्वरित निर्णय घेण्याची विनंती केली आहे.

पोलिसांना सानीटायझर व हँडवॉशचे मोफत वाटप !

ब्रम्हपुरी उपविभागीय पोलिस अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या पत्नी डॉ.प्राची मिलिंद शिंदे यांनी बनविले घरीच प्रॉडक्ट, त्यांच्या कार्याची पोलिस अधिक्षक रेड्डी यांनी केली प्रशंसा ! शुधा क्लीनसिंग सोल्यूशन्स (सानीटायझर) नाव देवून आणले प्रॉडक्ट समोर,

आपले पती बाहेर जाते ते आपले कर्तव्यावर मात्र कोरोना विरोधात आता जणू युद्ध सुरू आहे आणि या युद्धात आपल्याला जिंकायचे आहे त्यामुळेच मी आपल्या पतीसह पोलिस कर्मचाऱ्यांची कोरोना व्हायरस पासून सुरक्षा व्हावी म्हणून सानीटायझर आणि हँड वॉश घरीच तयार करून ते आपल्या पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांना मोफत देत आहे”

अशी प्रतिक्रिया ब्रम्हपुरी विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या धर्मपत्नी सौ. डॉ. प्राची शिंदे यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक मोहेश्वर रेड्डी यांनी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत दिली. त्यांच्या या कार्याची जिल्हा पोलिस अधिक्षक रेड्डी यांनी प्रशंसा केली असून अशा प्रकारचा उपक्रम समाजातील इतर घटकांनी राबविल्यास आपण कोरोना व्हायरस विरोधातील लढाईत नक्कीच जिंकू असा विश्वास व्यक्त केला आहे. या प्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी मिलिंद शिंदे, त्यांच्या पत्नी डॉ. प्राची शिंदे. उपविभागीय पोलिस अधिकारी देशमुख व इतर पोलिस अधिकारी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

400 युनिट पर्यंत विजेचा वापर करणाऱ्या गरीब व मध्यमवर्गीय वीज ग्राहकांचे वीज बिल माफ करावे

 

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना अनेक आघाड्यांवर अडचणींचा सामना करावा लागत आहे. 14 एप्रिल पर्यंत देशात लॉक डाऊन घोषित करण्यात आले आहे . त्यामुळे गरीब गरजू चिंतीत झाले आहे. या संकट समयी 400 युनिट पर्यंत विजेचा वापर करणाऱ्या गरीब व मध्यमवर्गीय वीज ग्राहकांचे वीज बिल माफ करण्यात यावे अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

कोरोना विषाणूच्या विरोधात जो लढा आपण सारे जण देत आहोत . या संकटाच्या काळात शासनातर्फे गरीब गरजू नागरीकांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे.लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट घेऊन जगणाऱ्या नागरिकांना तसेच मध्यमवर्गीय नागरिकांना अनेक अडचणी सहन कराव्या लागत आहे . या परिस्थितीत 400 युनिट पर्यंत विजेचा वापर करणाऱ्या गरीब व मध्यमवर्गीय वीज ग्राहकांचे वीज बिल माफ केल्यास त्यांना मोठा दिलासा मिळेल अशी भावना व्यक्त करत याबाबत त्वरित निर्णय घेण्याची मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांच्याकडे केली आहे.