‘पॉझेटिव्ह ते निगेटिव्ह’ करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा

– पालकमंत्री संजय राठोड
 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचाराबाबत आढावा

 

दिग्रस, दि. 28 : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाबाधित रुग्णांसाठी 500 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. डॉक्टरांसह संपूर्ण प्रशासन या आपात्कालीन परिस्थितीत अतिशय संवेदनशीलपणे काम करीत आहे. तरीसुध्दा भरती असलेल्या पॉझेटिव्ह रुग्णांना निगेटिव्ह करण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार तसेच करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आर.पी.सिंह, कोरोना नियंत्रण समन्वयक तथा बालरोग विभाग प्रमुख डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब चव्हाण, मेडीसीन विभाग प्रमुख डॉ. बाबा येलके आदी उपस्थित होते.
पॉझेटिव्ह असलेल्या नागरिकांवर योग्य उपचार ही अतिशय महत्वाची बाब आहे, असे सांगून श्री. राठोड म्हणाले, शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिका-यांनी केवळ पॉझेटिव्ह नमुने आलेल्या नागरिकांनाच वैद्यकीय महाविद्यालयात रेफर करावे. विलगीकरणातील सर्वांनाच येथे पाठवू नये. जेणेकरून येथील डॉक्टरांना पॉझेटिव्ह रुग्णांवर लक्ष केंद्रीत करता येईल. रुग्णांच्या उपचाराबाबत कोणताही अडथळा खपवून घेतला जाणार नाही. पॉझेटिव्ह नागरिकांच्या संपर्कातील लोकांचे विलगीकरण करणे, त्यांचे नमुने घेणे, त्यांची राहण्या-खाण्याची व्यवस्था करणे आदी बाबी शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने कराव्यात. त्यासाठी स्वतंत्र व्यवस्थेचे नियोजन करा. आपल्या अधिनस्त असलेला जिल्ह्यातील इतर स्टाफ यांना कामाला लावा. प्रत्येकावर जबाबदारी निश्चित करा. या परिस्थितीत कोणी कामचुकारपणा करीत असले तर त्याच्यावर कडक कारवाई करा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
भरती असलेल्या पॉझेटिव्ह नागरिकांना योग्य पध्दतीने हाताळणे वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाची जबाबदारी आहे. येथे सुरक्षा रक्षकांचा बंदोबस्त कडक ठेवा. पॉझेटिव्ह असलेल्या नागरिकांना वेळेवर व चांगल्या दर्जाचे जेवण मिळाले पाहिजे. जेवणाच्या संदर्भात ज्या काही गोष्टींची आवश्यकता असते त्या सर्व वैद्यकीय प्रशासनाने मागवून घ्याव्यात. वॉर्डाची स्वच्छता, पिण्याचे पाणी सर्व गोष्टींची पुर्तता होणे गरजेचे आहे. विलगीकरणासाठी शासकीय व खाजगी वसतीगृह अधिग्रहीत करून तेथे सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देणे शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिका-याचे काम आहे. असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
वैद्यकीय महाविद्यालयात भरती असलेल्या नागरिकांना सकाळी 9 वाजता नास्ता व दुपारी 12 वाजता चांगल्या दर्जाचे जेवण दिले जाते. याशिवाय त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी अंडी, फळे, प्रोटीनयुक्त पदार्थ तसेच व्हीटॅमीन ‘सी’ असलेले पदार्थ दिवसभरात देण्यात येते. जेवणाबाबत तक्रार येणार नाही, याची पुरेपुर काळजी घेऊ, असे यावेळी बैठकीत सांगण्यात आले.

यवतमाळ मध्ये आणखी 11 कोरोना पॉझिटिव्ह; आकडा पोहचला 61 वर यवतमाळ

यवतमाळ, : जिल्ह्यात सध्या कोरोना बाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या आणखी ११ जणांचे रिपोर्ट्स पॉझेटिव्ह आले आहे.

रविवारी रात्री ५ तर सोमवारी सकाळी ६ असे एकूण ११ जणांचे पॉझेटिव्ह अहवाल वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त झाले. त्यामुळे आयसोलेशन वार्डमध्ये दाखल एकूण एक्टिव पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या आता ६१ झाली आहे.

हे सर्व जण पॉझेटिव्ह रुग्णांच्या हाय रिस्क कॉन्टेक्ट मधील असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यात दोन दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येने झपाट्याने वाढ झाली असल्याने जिल्हातील नागरिकात भीतीचे सावट पाहण्यास मिळत आहे.

संत गाडगे बाबांच्या वंशजांचा डेबूजी युथ ब्रिगेड मध्ये प्रवेश

( अमरावती प्रतिनिधी )

आज डेबूजी यूथ ब्रिगेड अमरावती जिल्हा पदाधिकारी
यांनी संत गाडगे बाबा यांचे जन्मगाव शेंडगाव येथे भेट गाडगे
बाबांच्या वंशजांची भेट घेतली. यावेळी डेबूजी युथ ब्रिगेड चे
संस्थापक अध्यक्ष मा.राहुल बरणकार उपस्थित होते.
बाबांच्या वंशजांकडून वरणकर सत्कार करण्यात
आला. तसेच 23 फेब्रुवारी बाबांच्या जयंती च्या कार्यक्रमाची
सविस्तर चर्चा करून पाया रचला. डेबूजी युथ ब्रिगेड चे
विचार ऐकन संत गाडगे बाबा चे वंशज असलेले
मा.श्री.नितीन भाऊ जानोरकार, मा.अनंता भाऊ जानोरकार
यांनी डेबूजी युथ ब्रिगेड मध्ये जाहीर प्रवेश केला व आता
डेबूजी यूथ ब्रिगेड सोबत गाडगे बाबांचे रखडलेले काम पूर्ण
करणार असे बाबांच्या वंशजांनी म्हटले. 23 फेब्रुवारी ला
समस्त धोबी समाज बांधव व गाडगे बाबांना मानणार्या
वर्गाने शेंडगाव येथे येण्याचे आव्हाहन वरणकार साहेबांनी
केले. यावेळी संस्थापक अध्यक्ष वरणकर साहेब, प्रभारी
जिल्हाध्यक्ष अमरावती सतीश भाऊ सांबसकर, सोशल
मीडिया अमरावती मयूर सावरकर, अंजनगाव तालुका
अध्यक्ष पंकज ठाकरे, तालुका संघटक राजेश भाऊ शेवाने,
प्रवीण भाऊ जानोरकर व समाज बांधव उपस्थित

निखिल कौरसे या पोलिस शिपायाने पिण्यासाठी अर्धा बंपर दारू पकडली

 

पोलिस कंट्रोलला आरोपीने फोन केल्यानंतर केला गुन्हा दाखल

चंद्रपूर प्रतिनिधी :- जिल्ह्यात दारूबंदीचा फायदा जर कोनाला झाला असेल तर अर्थातच तो मोठ्या प्रमाणांत पोलिसांचा झाला आहे.दररोज लाखो रुपयाची दारू पकडल्या जाते मात्र ती कमी दाखवून काही पोलिस कर्मचारीच पकडलेली दारू अवैध दारू व्यवसायीना विकत असल्याचा विषय चर्चील्या जात आहे.अशातच काही पोलिसवाले तर एका दारूच्या बंपरसाठी किंव्हा एका पव्व्यासाठी सुद्धा गुन्हे दाखल करतात तर काही पोलिसवाले दारू जप्त करून ती स्वतःच गटकतात असे अनेक प्रकार समोर येत आहे.असेच एक प्रकरण वरोरा पोलिस स्टेशन अंतर्गत नंदोरी टोलनाक्यावर दिनांक ११ नोव्हेंबरला सकाळी ५,३० वाजता घडली असून वरोरा पोलिस स्टेशन मधे डीबी पथकात कार्यरत निखिल कौरासे व इतर दोन ते तीन पोलिस कर्मचाऱ्यांनी उमेश देशमुख यांच्या चार चाकी गाडीतून रॉयल चैलेण्ज नावाच्या इंग्लिश दारूचा अर्धा बंपर पकडल्या नंतर तो स्वतःसाठी प्यायला ठेवला असल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र उमेश देशमुख यांनी पोलीसानी आपल्यावर करवाई न करता अश्लील आणि अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून अपमानित झाल्यामुळे पोलिस शिपाई निखिल कौरासे व इतर पोलिस कर्मचाऱ्यांची पोलिस कंट्रोल रूम (१००) मधे तक्रार केल्यानंतर आता आपले विंग फुटून आपल्यावर करवाई होणार या भितीने सूडबुद्दीने तक्रारकर्त्या उमेश देशमुख यांचेवर तब्बल १२ तासानंतर गुन्हा नोंद केल्याचा धक्कादायक प्रकार पोलिस शिपाई निखिल कौरासे व इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी केल्यामुळे आपले विंग फुटताच आपल्या खाकी वर्दीचा दुरुपयोग करून सर्वसामान्य व्यक्तीवर पोलिस कसे छडयंत्र रचतात हे या घटनेवरून दिसून येते.
उमेश देशमुख हे पोहाणे ले आऊट बोर्डा येथील रहिवासी असून ते एक सामजिक कार्यकर्ते आहेत. त्यांच्या विरोधात आजपर्यंत कुठल्याही पोलिस स्टेशन मधे कोणत्याही प्रकारची पोलिस केस नाही, अशा सामजिक कार्यकर्त्यांनी एक अर्धा बंपर दारू बाळगणे हा गुन्हा जरी असला तरी तो त्यांनी कबूल सुद्धा केला होता, पण निखिल कौरासे हा वरोरा येथील स्थाईक असून त्याला त्याच्या मूळ गावी कार्यरत ठेवणे नियमबाह्य आहे, कारण त्यांचे वरोरा येथील अवैध धंदेवाईक यांच्यासोबत चांगले संबध असल्यामुळे एखादी पोलिस धाड जरी पडली तरी हा पोलिस शिपाई अगोदरच ती माहिती समन्धित अवैध व्यावसायिकांना पोहचवीतात त्यामुळे पोलिसांच्या कारवाईला महत्वच उरत नाही त्यामुळे निखिल कौरासे यांची अनेकदा बदली झाली असतांना सुद्धा त्यांना वरोरा येथेच का ठेवन्यात येत आहे ? हे कोडे अजूनपर्यंत कुणालाच सोडवता आले नाही.खरं तर निखिल कौरासे आणि त्यांच्या इतर पोलिसांच्या मनात उमेश देशमुख प्रकरणी चोर लपला असल्याने व यांना वाटंमारी करण्याची सवय असल्याने यांनी अर्धा बंपर दारू स्वतःला पिण्यासाठी ठेवली होती हे आता शीद्ध होतं आहे. कारण
निखिल कौरासे हे त्याच दिवशी त्यांचे मित्र रूयारकर यांच्या अंत्यसंस्कार यात्रेत दारू पिऊन असल्याचे अनेकांनी परस्पर चर्चेतून समोर आले आहे. अर्थात पोलिसच दारूडे असेल तर सर्वसामान्य जनतेने दारू पिणे हा गुन्हा कसला ? हा प्रश्न सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे.कारण जे स्वतःच चोर असेल तर चोराला पकडण्यापेक्षा चोराला असे पोलिस कर्मचारी चोरी करण्यास मदतच करीत असेल आणि ही बाब आता वरील प्रकरणावरून शीद्ध सुद्धा होतं आहे.
सामजिक कार्यकर्ते उमेश देशमुख यांनी आपला गुन्हा कबूल केल्यानंतर सुद्धा त्यांना काल शनिवार पर्यंत पोलीसानी अटक न करता त्यांच्या मित्रांकडे निखिल कौरासे हा पोलिस शिपाई ‘ त्या उमेश देशमुखला मी आता कसा पीसीआर घेऊन झोडपून काढतो तेच त्यांनी बघाव, मी त्याला वरोरा येथे राहणे मुश्किल करून टाकीन’ अशा प्रकारच्या धमक्या देवून ऐन शनिवारला उमेश देशमुख यांना अटक करण्याचे कारस्थान रचले होते मात्र उमेश देशमुख यांनी अगोदरच त्यांचे कारस्थान उलटे पाडून सरळ जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय गाठले आणि तक्रार देवून निखिल कौरासे व इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी सूडबुद्दिने करवाई केल्याबद्दल त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.त्यामुळे आता वरोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हे काय करवाई करतील याकडे वरोरावाशीयांचे लक्ष लागून आहे.

आत्महत्या केलेल्या वनरक्षकावरील कारवाई कायदेशीरच: वरिष्ठांचा नव्हता दबाव पश्चिम चांदा वनप्रकल्प विभागाचा खुलासा

आत्महत्या केलेल्या वनरक्षकावरील कारवाई कायदेशीरच: वरिष्ठांचा नव्हता दबाव

पश्चिम चांदा वनप्रकल्प विभागाचा खुलासा

(चंद्रपूर  प्रतिनिधी) दि. 11 नोव्हेंबर: वन विभागातून निलंबित झालेल्या वनरक्षकाने केलेली आत्महत्या ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. त्यांच्या कुटुंबाप्रती वनविकास महामंडळ पूर्ण संवेदना व्यक्त करते. तथापि, वनरक्षक असलेले गणेश झोंबाडे यांचेकडून वनविकास महामंडळाचे कामांमध्ये होत असलेली गंभीर अनियमितता यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यांच्यावरील कोणत्याही वरिष्ठांचा दबाव नव्हता. त्यांच्यावर झालेली निलंबनाची कारवाई ही कायदेशीरच आहे. त्यामुळे 10 नोव्हेंबर 2019 रोजी काही वृत्तपत्रांमध्ये वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून वनरक्षकाची आत्महत्या हे वृत्त साफ चुकीचे आहे, असा खुलासा वनविकास महामंडळाच्या पश्चिम चांदा वन प्रकल्प विभागाने केला आहे.

स्वर्गीय गणेश झोंबाडे हे मामला परिक्षेत्रात कार्यरत असताना त्यांच्याकडे प्राप्त पर्यटकांकडून बस बुकिंगची रक्कम वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे जमा करायची होती. परंतु कोणतीही पूर्वसूचना न देता ते अनधिकृतपणे गैरहजर राहिले. तसेच निसर्ग पर्यटन संकुलातील निवासस्थानाच्या किरायापोटी पर्यटकांकडून जमा झालेली रक्कम बँकेत न भरता बँक ऑफ महाराष्ट्रचा बनावट शिक्का लावून त्यावर बँक कर्मचाऱ्याची बनावट स्वाक्षरी करून महामंडळाच्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी त्यांना निलंबित करण्यात आले होते. सदर शिक्षा त्यांना मान्य होती व त्यावर त्यांनी कोणतीही अपील दाखल केली नव्हती. त्यांनी आत्महत्या केल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. याबाबत चौकशी करण्यात येत असून या प्रकरणांमध्ये क्षेत्रीय स्तरावर तसेच विभागीय कार्यालयामध्ये दुर्लक्ष झाल्याची बाब निदर्शनास आल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा खुलासा वन विकास महामंडळाने केला आहे.

तीन जिल्ह्यातील दुचाकी चोरट्यांना अटक; सूत्रधार महिलेकडून मुलांचा वापर

स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही

राम जाधव/यवतमाळ (प्रतिनिधी)
   स्थानिक गुन्हे शाखेला 6 तारखीला गुप्त बतमीदारकडून खात्रीलायक माहिती मिळाली की, तीन इसम एक चोरीची मोटरसायकल विक्री करण्यासाठी दिग्रस येथून पुसदमार्गे उमरखेड कडे जाणार आहेत. त्या माहितीवरून पोहवा गोपाल वास्टर सोबत पोलीस उपनिरीक्षक निलेश शेळके व त्यांचे पथक शासकीय वाहनाने पंचसह रवाना होऊन साई मंदिर उमरखेड रोड पुसद येथे सापळा रचून होते. अश्यातच माहितीप्रमाणे तीन संशयीत एका मोटर सायकल भरधाव वेगाने येतांना दिसल्याने थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्यातील मागे बसून असलेला एक आरोपी पळून गेला व वाहन चालविणारा नामे शेख अल्ताफ शेख मुस्ताक वय21 रा. स्वछता कामगार कॉलनी, वांगी रोड परभणी ता.जि परभणी व त्याचे सोबत मागे बसून असलेला एक विधी संघर्ष ग्रस्त बालक मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेतले आहे.
       आरोपींची कसून विचारपूस केली असता मोटरसायकल ही दिग्रस येथून चोरली असल्याचे सांगितले व पळून गेलेला आरोपी नामे अमीर खान अफजल खान वय 23 वर्षे रा.साईबाबा नगर, वांगी रोड परभणी ता.जि.परभणी व आरोपी सैय्यद अमीन सैय्यद परवेज वय 21 वर्ष रा.मोतिनगर दिग्रस जि. यवतमाळ यांनी मिळून यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस ,उमरखेड व नांदेड जिल्ह्यातील हदगाव तर वाशिम जिल्ह्यातील सुद्धा मोटरसायकली चोरून दिग्रस येथील एका महिलेच्या घरी ठेवून असल्याचे चौकशीत समोर आले आहे. तर ती महिला परजिल्ह्यातील लहान मुलांना पैशाचे अमिष दाखवून त्या मुलाकडून मोटरसायकल चोरी करून घ्यायची असे प्रथम दर्शनी समोर आले.त्यानंतर आरोपी महिलेच्या घरी पथकाने पंचासह घरझडती घेतल्यानंतर  विविध कंपनीच्या 8 मोटरसायकल मिळून आल्याने अश्याप्रकारे विविध कंपनीच्या 9 मोटरसायकल किंमत अंदाजे 2,45,000/ रूपयाचा मुद्देमाल जप्त करून यवतमाळ,नांदेड, वाशिम जिल्ह्यातील गुन्हे उघडकीस आले आहेत.
     तसेच आरोपी नामे शेख अल्ताफ शेख मुस्ताक, एक महिला, एक विधी संघर्षेग्रस्त बालकास पुढील तपासासाठी पोलीस स्टेशन दिग्रस यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
   सदरची कामगिरी मा.श्री.एम.राजकुमार, पोलीस अधिक्षक यवतमाळ, श्री नुरुल हसन अतिरिक्त पोलीस अधिक्षक,श्री.अनुराग जैन सहा. पोलीस अधिक्षक पुसद, श्री.प्रदीप शिरस्कर पोलीस निरीक्षक स्था.गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश शेळके,सचिन पवार,पोहवा गोपाल वास्टर,पोना विशाल भगत,पंकज पातूरकर, मुना आडे,पोकॉ.मो.ताज, सुरेंद्र वाकोडे,ड्रापोकॉ/नागेश वास्टर, सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ व पुसद पोलीस स्टेशन मपोकॉ/ज्योती राठोड व पो.स्टे. दारव्हा मपोकॉ.शीतल मोहिते यांनी पार पडली.

‌ काही तासातच मारेकरी पोलिसांच्या ताब्यात रविनगर भागातील घटना वणी

(प्रतिनिधी वणी) वणी शहरातील रविनगर भागातील आसुटकर यांचे घराच्या माळ्यावरील खोलीत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. या घटनेचा आरोपी आणि मृतक शोधणे पोलिसांपुढे जणू आव्हान होते. उपविभागीय पोलीस अधिकारी आणि वणी पोलिसांनी अवघ्या काही तासातच नागपूर येथून मारेकऱ्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
रविनगर भागातील आसुटकर अनिल आसुटकर यांच्या घरी आर्वी जिल्हा वर्धा येथील करण कश्यप हा तरुण खोली किरायाने करून रहात होता. करणचा चा सतीश देवासे हा मोर्शी जिल्हा अमरावती येथील मित्र चंद्रपुरातील एका फायनान्स कंपनीमध्ये काम करीत होता. सतीशचे करण कडे ६० हजार रुपये कर्ज होते. ती रक्कम सतीश करण ला मागत होता. सदर रक्कम करण चुकवू शकत नसल्याने करणने सतिशचा काटा काढायचे ठरविले. आणि रविनगर येथील खोलीवर नेऊन सतिशचा रविवारी खून केला. सतिशचा मृतदेह एक पोत्यात भरला मात्र तो मृतदेह त्याला बाहेर काढता येत नसल्याने मृतदेह तसाच ठेऊन पळ काढला.
या घटनेची माहिती मंगळवारी लागताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक,ठाणेदार वैभव जाधव,आणि पोलीस घटनास्थळ पंचनामा करीत असतानाच उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक,इकबाल शेख हे आरोपीच्या शोधात बाहेर पडले. त्यांनी मोबाईल लोकेशनचा आधार घेत बजाजनगर नागपूर गाठले. अत्यंत हुशारीने काचीपूरा भागात मामाच्या घरी आडोसा घेऊन असलेल्या करण कश्यप ह्याला नागपूर गुन्हे शाखेच्या मदतीने ताब्यात घेतले आहे. ६० हजार रुपयांची केलेली उचल परत करायची नसल्याने करण ने मित्राचा निर्घृण खून केला असल्याचे दिसून आले आहे. अवघ्या काही तासातच उपविभागीय पोलीस अधिकारी आणि चमुने आरोपि ताब्यात घेतल्याची हि तीसरी घटना आहे.

देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात संपूर्ण परिषद पदाधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर

(प्रतिनिधी चंद्रपूर )पालकमंत्र्यांकडून पदाधिकाऱ्यांचा, जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासनाचा आढावा

जिल्हयात ६५ टक्के पंचनाम्याचे काम पूर्ण
उर्वरित पंचनामे दोन दिवसात पूर्ण करणार

चंद्रपूर दि. ४ नोव्हेंबर : पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनंतर जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात संपूर्ण जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परतीच्या पावसाच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी सुरू केली आहे प्रशासनाला सोबत घेऊन ही पाहणी होत असून पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज या संदर्भात आढावा घेतला तर जिल्हाधिकारी डॉ कुणाल खेमनार यांनीदेखील जिल्ह्याच्या विविध भागात भेटी देऊन सर्वेक्षणाच्या कामकाजाचा आढावा घेतला.
जिल्हयामध्ये ४ लाख ४६ हजार ४४६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. पैकी दिवाळी दरम्यान व त्यानंतर झालेल्या परतीच्या, अवकाळी पावसाने ६४ हजार ९१२ हेक्टर क्षेत्रात मोठया प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज आहे.पैकी ४० हजार ६८ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. जवळपास ६५ टक्के पंचनाम्याचे काम पूर्ण झाले आहे.उर्वरित काम पुढील दोन दिवसात पूर्ण होणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान ,परतीच्या पावसाने चंद्रपूर जिल्ह्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांनी प्रत्यक्ष जाण्याचे निर्देश पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले होते यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी त्यांनी विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी व जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक घेतली होती. आज मुंबई येथून त्यांनी या संदर्भात आढावा घेताना पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या भेटी बाबतची माहिती जाणून घेतली सोबतच जिल्हा प्रशासनासोबत चर्चा करून सर्वेक्षणाला आणखी गती देण्याबाबतच्या सूचना केल्या.
परतीच्या पावसामुळे सोयाबीन, धान, कापूस व भाजीपाला पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. पिकांची नासाडी झाली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी आज चंद्रपूर, भद्रावती या तालुक्यासह विविध शेत शिवारात स्वतः जाऊन भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले ,कृषी सभापती अर्चना जीवतोडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.उदय पाटील, जिल्हा कृषी विकास अधिकारी शंकर किरवे आदी उपस्थित होते.

शेतीच्या सर्वेक्षणातून कोणीही सुटू नये याची काळजी घ्या : जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

चंद्रपूर जिल्ह्यातील 15 ही तालुक्यामध्ये सर्वेक्षणाचे काम प्रगतिपथावर असून यामध्ये हे कोणीही शेतकरी सुटता कामा नये. यासाठी शासकीय यंत्रणेने सामान्य नागरिकांची देखील मदत घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुनाल खेमनार यांनी केले आहे.
जिल्ह्याच्या विविध भागात सर्वेक्षण सुरू असल्यामुळे आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी जिल्ह्यातील विविध भागांना आज भेटी दिल्यात. सध्या ६०ते ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे.प्रत्येक पंचनामा होईपर्यंत सर्वेक्षण सुरू राहील असे त्यांनी सांगितले. राज्य शासनाचे यासंदर्भात वेळोवेळी जारी केलेल्या निर्देशांचे पालन करण्यात येत आहे,असे स्पष्ट केले.
जिल्ह्यातील सर्व यंत्रणेला चार तारखेपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यामुळे जवळपास सर्वेक्षणाचे काम यंत्रणेने पूर्ण केले आहे. तथापि, यामधून कोणीही सुटू नये, यासाठी आमचा प्रयत्न आहे.
दरम्यान जिल्ह्याचे पालक मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या बैठकीमध्ये प्रत्येक जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच यांनी देखील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले होते. वेगवेगळे व्हाट्सअप ग्रुप यासाठी तयार करण्यात आले असून त्यांच्यामार्फत मिळणाऱ्या सूचनांना देखील सर्वेक्षण करताना लक्षात घेतले जात असल्याचे जिल्हाधिकारी खेमनार यांनी स्पष्ट केले.

गडचिरोलीत 2 नक्षलवाद्यांचा खात्मा

गडचिरोली: गडचिरोलीत रविवारी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. यामध्ये दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. ग्यारापत्ती येथील नरकसा जंगलाच्या परिसरात रविवारी पहाटे ही चकमक झाली.

या परिसरात सी-६० पथकाचे जवान गस्त घालत असताना त्यांचा नक्षलवाद्यांशी सामना झाला. यानंतर दोन्ही बाजूंनी तुफान गोळीबार झाला. यामध्ये दोन नक्षलवादी ठार झाले. तर काही नक्षलवादी जखमीही झाल्याचे वृत्त आहे. यामध्ये सी-६० पथकाच्या हाती मोठा शस्त्रसाठाही सापडल्याचे समजते. पोलीस दलाकडून अधिक कारवाई सुरू आहे.

सुंदर विचार समाजात रुजविण्याच्या कार्यात योग्य समित्यांनी पुढे यावे : ना. सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर दि 14 सप्टेंबर : फिट इंडिया हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे कार्य योग्य चळवळीच कार्य असून तेच कार्य आपण गावागावात पोहोचून सकारात्मक व सुंदर विचार करणाऱ्या समाज निर्मितीच्या कार्यात स्वतःला वाहून घ्यावे, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन, वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले

स्थानिक पतंजली योग समितीमार्फत आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. डॉ. शामा प्रसाद मुखर्जी वाचनालयामध्ये आयोजित या कार्यक्रमात योग साधना करणाऱ्या अनेक समित्यांना स्पीकर्सचे वाटप करण्यात आले.

यावेळी त्यांनी करो योग रहो निरोग, या वाक्याचा पुनरुच्चार करताना चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ही मोहीम अतिशय प्रभावीपणे राबवून सर्वसामान्य नागरिकांचा मार्ग योग समितीकडे वळवा. हॉस्पिटलच्या मार्गाला त्यांना जाऊ देऊ नका, असे आवाहन देखील केले. जिल्ह्यामध्ये आरोग्य सेवेकडे आपण विशेष लक्ष देत असलो तरी जिल्ह्यातील हॉस्पिटलमध्ये जनतेला जावेच लागू नये अशा पद्धतीच्या निरोगी आयुष्याची सुरुवात, योग्य समित्यांमार्फत घराघरात व्हावी, अशी अपेक्षा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी उपस्थित महिला पतंजली योग समिती व पतंजली योग समितीच्या सदस्यांना त्यांनी लाऊडस्पीकर्सचे वाटप केले व त्यांच्या सोबत छायाचित्र सुद्धा काढले.

यावेळी व्यासपीठावर बल्लारपूर नगराध्यक्ष हरीश शर्मा पतंजली योग समितीचे मंडळ प्रभारी राजकुमार पाठक, विमल कासटीया, रमेश कासुळकर, हेमंत मल्लेरवार, ज्योतीताई मसराम, अनिल बंडीवार, प्रकाश धारणे, सुधा साधनकर ,परिनीती जयस्वाल, अशोक संगीडवार आदींची उपस्थिती होती.