कुख्यात गॅंगस्टर एजाज लकडावाला अखेर सापडला, मुंबई पोलिसांना मोठं यश

मुंबई पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा हस्तक, कुख्यात गॅंगस्टर एजाज लकडावालाला . कुख्यात गॅंगस्टर एजाज लकडावाला. मुंबई गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. बिहारच्या पाटण्यातून एजाज लकडावालाला पकडण्यात आलं. पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केलं असता, कोर्टाने त्याला 21 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. . कुख्यात गॅंगस्टर एजाज लकडावाल

एजाज लकडावालाच्या मुलीला काही दिवसांपूर्वी मुंबई विमानतळावर अटक केली होती. ती बोगस पासपोर्टवर देश सोडून जात होती. तिला अटक केल्यानंतर तिच्याकडे केलेल्या तपासात एजाज लकडावालाची माहिती उघड झाली होती.एजाज लकडावालावर जवळपास 25 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. एजाज लकडावाला हा दाऊदचा अत्यंत जवळचा सहकारी होता. मात्र दाऊदसोबतच्या वादानंतर तो गँगस्टर छोटा राजनच्या टोळीत गेला होता. मुंबईत झालेल्या अनेक गुन्ह्यांमध्ये लकडावालाचा सहभाग होता. वर्ष 2003 मध्ये एजाज लकडावालाचा मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती. मात्र तो बँकॉकवरुन कॅनडाला पळून गेला होता. गेल्या अनेक वर्षांपासून तो तिथेच होता. लकडावालाने छोटा राजनशी हातमिळवणी केल्याने दाऊद नाराज असल्याची चर्चा होती.दरम्यान, यापूर्वी पोलिसांनी लकडावालाची मुलगी सोनिया लकडावाला उर्फ सोनिया शेखला शुक्रवारी रात्री मुंबई विमानतळावरुन अटक केली होती. सोनिया बनावट पासपोर्टच्या आधारे नेपाळला जाण्याच्या तयारीत होती. त्यावेळी पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन एजाज लकडावालाची माहिती मिळवली.

एजाज हा छोटा राजन गॅंगमध्ये होता. त्यापूर्वी तो दाऊद गॅंगमध्ये होता. छोटा राजनवर हल्ला झाल्यानंतर तो छोट राजन गॅंगमधून वेगळा झाला होता. त्याच्याविरोधात 27 गुन्हे दाखल आहेत.शिवाय सुमारे 80 तक्रारी आहेत. देशाच्या विविध राज्यातही लकडावालाविरोधात गुन्हे दाखल आहेत.

मुंबई पोलीस अनेक महिन्यांपासून शोध घेत होते. त्याच्या मुलीला 28 डिसेंबर रोजी अटक केली होती. ती सोनिया मनीष अडवाणी या बोगस नावाने पासपोर्ट बनवून नेपाळला निघाली होती. त्यावेळी तिला मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली. त्याच्या मुलीला अटक केल्यावर पोलिसांना एजाज लकडावालाविरोधात अनेक माहिती मिळाली.

एजाज लकडावाला हा 8 जानेवारी 2020 रोजी बिहारमध्ये येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तयारी केली होती. पोलिसांनी बिहारमधीळ पाटण्यातील जनकपूर इथे लकडावालाला अलगद पकडला. काल रात्री त्याला मुंबईत आणून अटकेची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

महाराष्ट्र पोलिसांना जगातील सर्वोत्तम गोष्टी उपलब्ध करून देऊ’ उद्धव ठाकरे यांनी आज बोलताना सांगितले

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पोलिस प्रशिक्षण केंद्र, मरोळ येथे महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन संचलन समारंभ पार पडला. यावेळी त्यांनी महाराष्ट्र पोलिस दलाशी संवाद साधला. कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे, पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल यावेळी उपस्थित होते. त्यावेळी बोलताना, महाराष्ट्र पोलिसांना जगातील सर्वोत्तम गोष्टी उपलब्ध करून देऊ, अशा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला.मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या वतीने मुंबई पोलिस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी मरोळ येथे बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानाच्या प्रकल्पाचे भूमिपूजन केले. या प्रकल्पात प्रशासकीय इमारत, विश्रांतीगृह, वसतीगृह, क्रीडासंकुल आणि सर्व सुविधायुक्त 448 सदनिकांचे बांधकाम करण्यात येणार आहे. यात तळमजल्यासह सात मजल्यांच्या 16 इमारतींचा समावेश असणार आहे.

पोलीस नेहमीच तणावात असतात, त्यामुळे नववर्षात त्यांना तणावमुक्त करण्याची जबाबदारी शासन घेईल असे सांगून मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी पोलिसांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच, पोलिसांचे संचलन आणि मानवंदना यांचा सन्मान स्वीकारण्याची संधी मिळाली हा आयुष्यातील अनमोल ठेवा आहे. पोलिसांचे प्रशिक्षण, अत्याधुनिक सुविधा यासाठी जगातील सर्वोत्तम गोष्टी महाराष्ट्र पोलिसांना उपलब्ध करून देण्याची ग्वाही उद्धव ठाकरेंनी दिली.

सर्व नाट्यमय घडामोडींनंतर आजच्या ‘सामना’तून भाजपवर जोरदार टीकास्त्र !

        लक्षवेधी

महाराष्ट्रातील संपूर्ण सत्तापेचात शिवसेनेची परखड भूमिका बजावणारे शिवसेना नेते संजय राऊत काल झालेल्या राजकीय भूकंपावर आजच्या ‘सामना’मध्ये काय लिहितात याकडे सर्वांच लक्ष लागलं होतं. संजय राऊत यांनी काल झालेल्या राजकीय नाट्यावर भाजपचा जोरदार समाचार घेतला आहे. तसेच कालचा दिवस महाराष्ट्रातील राजकारणातला काळा दिवस असल्याचं म्हटलं आहे.

पुरोगामी महाराष्ट्राच्या राजकारणात शनिवार 23 नोव्हेंबर 2019 हा दिवस ‘काळा दिवस’च म्हणून नोंदवला जाईल. भाजपने 22 तारखेला रात्रीच्या अंधारात गुपचूप हालचाली करून पहाटे मुख्यमंत्र्यांचा शपथविधी उरकला, अशा शब्दात संजय राऊत यांनी अग्रलेखाच्या माध्यमातून भाजपवर टीकेचा बाण सोडला आहे.

अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा असा विश्वासघात केलेला असतानाच राज्यभरात संतापाची लाट उसळली. अजितदादांसोबत गेलेले अनेक आमदारही सायंकाळपर्यंत स्वगृही परतले आणि अवघ्या 12 तासांतच अजितदादांच्या बंडाचे पुरते 12 वाजले, असं सामनामध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर शिवसेनेनं भाजपवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यास सुरूवात केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांना राजीनामा द्यावा लागेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ८ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत देवेंद्र फडणवीस हे आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील.

विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून चौदा दिवस उलटले आहेत मात्र अद्यापही राज्यात नवं सरकार स्थापन झालेली नाहीये. त्यातच आता देवेंद्र फडणवीस उद्या (८ नोव्हेंबर) आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ८ नोव्हेंबर रोजी १३व्या विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे तांत्रिक बाब म्हणून देवेंद्र फडणवीस यांना राजीनामा द्यावा लागेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ८ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत देवेंद्र फडणवीस हे आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील. राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील.

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर विद्यमान मंत्रिमंडळ हे बरखास्त होईल.

विधानसभा निवडणुकीच्या निवडणुकांचे निकाल २४ ऑक्टोबर रोजी जाहीर झाले. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक म्हणजेच १०५ जागांवर विजय मिळवला. तर महायुतीमधील शिवसेनेने ५६ जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे सत्तेच्या चाव्या शिवसेनेच्या हातात गेल्या आहेत. शिवसेना आणि भाजप मुख्यमंत्रिपदावर अडून बसले आहेत. परिणामी सत्ता संघर्ष आणखी वाढला आहे.

गुरुवारी भाजप नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतल राज्यातील राजकीय परिस्थितीची माहिती दिली. तर तिकडे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व आमदारांची बैठक घेतली. या बैठकीनंतरशिवसेना फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्युल्यावर ठाम असल्याचं सांगण्यात आलं. तसेच मुख्यमंत्रिपदावर चर्चा करणार असाल तरच चर्चा होईल असंही शिवसेनेने सांगितलं आहे. सध्याची परिस्थिती पाहता दगाफटका होऊ नये म्हणून शिवसेनेने आपल्या आमदारांना मुंबईतील रंगशारदा हॉटेलमध्ये वास्तव्यास ठेवलं आहे. तर भाजपनेही आपल्या १०५ आमदरांना आणि समर्धन देणाऱ्या आमदारांना मुंबईत तातडीने बोलावलं आहे. त्यामुळे आता शुक्रवारी नेमक्या काय घडामोडी होतात हे पहावं लागेल.

आता फोडाफोडीचे राजकारण सुरू झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हा आरोप केला आहे.

 

मुंबई : भाजप आमच्या आमदारांशी संपर्क साधत असून प्रलोभनं दाखवली जात आहेत, असा थेट आरोप कॉंग्रेसकडून करण्यात आलेला आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर आता फोडाफोडीचे राजकारण सुरू झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हा आरोप केला आहे. भाजप सध्या जे काही वागत आहे ते घटनाबाह्या वागत असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.

वडेट्टीवार म्हणाले, सद्य स्थिती पाहता एकीकडे भाजपने सत्तेतून माघार घ्यावी, अन्यथा मोठा पक्ष म्हणून सत्ता स्थापन करावी. नाहीतर थेट सांगून टाकावे की, आम्ही सत्ता स्थापन करत नाही. मात्र ते पुढेही जात नाहीत व मागे देखील येत नाहीत.
केवळ त्यांनी सत्तेचं घोंगड भिजत ठेवले आहे. आमच्याशिवाय कोणी नाही ही भूमिका लोकशाहीला धरून नाही. भाजप आता जे काही करत आहे, ते घटनाबाह्य करतं आहे, असा आमचा आरोप आहे. राज्यात जर राष्ट्रपती राजवट लागू होत असेल तर त्याला संपूर्णपणे जबाबदार भाजप असेल, असे त्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. आम्ही विरोधी पक्षाची भूमिका निभावणार आहे. म्हणून जबाबदारी भाजपा आणि शिवसेनेची आहे. ते जर अपयशी ठरत असतील तर त्यावेळी आमची भूमिका आम्ही ठरवू.

मुख्यमंत्री यांनी घेतली राज्यपाल यांची सदिच्छा भेट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची सदिच्छा भेट

मुंबई, दि. 28 : – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राजभवन येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यपाल श्री. कोश्यारी यांना दिवाळीनिमित्त शुभेच्छा दिल्या आणि राज्यातील सद्यस्थितीची माहिती दिली.

अवैधरित्या मद्यपुरवठा करणाऱ्या मुंबईतील ६ परवानाधारकांचा परवाना रद्द

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त प्राजक्ता लवंगारे – वर्मा यांची माहिती

मुंबई : विधानसभा निवडणुका निर्भीड व खुल्या वातावरणात पार पडण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत मुंबईमध्ये नियमभंग करणाऱ्या काही परवानाधारकांवर कडक कारवाई करण्यात आली. ६ परवानाधारकांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. यापुढेही अवैधरित्या मद्यपुरवठा करणाऱ्या अथवा नियमभंग करणाऱ्या अनुज्ञप्तींविरोधात अनुज्ञप्‍ती रद्द अथवा निलंबनाची कठोर कारवाई करण्याचा इशारा राज्य उत्पादन शुल्क आयुक्त प्राजक्ता लवंगारे – वर्मा यांनी दिला आहे. सर्व राज्य उत्पादन शुल्क अधिकारी व कर्मचारी यांना याबाबत सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

निवडणूक आचारसंहिता नियमांचा तसेच मुंबई विदेशी मद्य नियमावली 1953 अंतर्गत नियमांचा भंग करणाऱ्या व अवैधरित्या मद्यविक्री करणाऱ्या मुंबई उपनगर जिल्ह्यातील वैशाली वाईन्सव्हरायटी वाईन्स या एफएल-II अनुज्ञप्तीविरुध्द कठोर पाउले उचलून या अनुज्ञप्ती रद्द करण्यात आल्या आहेत. अवैधरित्या मद्यपुरवठा करणाऱ्या वैशाली वाईन्स या अनुज्ञप्तीसोबत अवैध मद्याचा पुरवठा होणाऱ्या हॉटेल किनारा या एफएल-III अनुज्ञप्तीचाही परवाना रद्द करण्यात आला आहे. तसेच मुंबई विदेशी मद्य नियमावली 1953 अंतर्गत अटी व शर्थींचे पालन न करणाऱ्या शशी लंच होमहॉटेल स्वस्तिक या एफएल-III अनुज्ञप्ती निवडणूक कालावधी संपेपर्यंत निलंबित करण्यात आल्या आहेत. 24 लाँज बारप्लॅटिनम बारशिवलीला बारजरना हॉटेल एफएल – III अनुज्ञप्ती ह्या 08 ते 15 दिवसांकरिता निलंबित करण्यात आल्या आहेत. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांच्या आदेशान्वये मुंबई उपनगर जिल्ह्याच्या अधीक्षक स्नेहलता श्रीकरनिरीक्षक मनोज चौधरी यांच्यामार्फत ही कार्यवाही करण्यात आली.

निवडणूकीदरम्यान जिल्ह्यात अनुचित प्रकार घडू नये यासाठी एफएल-II, एफएल-III व सीएल –III इ. मद्यविक्री करणाऱ्या अनुज्ञप्तींवर सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ऑनलाईन पध्दतीने मद्यविक्रीची माहिती भरणेविहीत वेळेत मद्य अनुज्ञप्ती उघडणे व बंद करण्याच्या वेळा कसोशिने पाळणेमद्य विक्रीच्या नोंदवह्या व मद्यसाठा अद्यावत ठेवणे याबाबत जिल्ह्यातील सर्व अनुज्ञप्तीधारकांस निर्देश देण्यात आलेले आहेत.

राज्यात 3 लाख 96 हजार दिव्यांग मतदारांची नोंदणी

मुंबईदि. 8 : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात एकूण 3 लाख 96 हजार 673 दिव्यांग मतदारांची नोंदणी झाली आहे. दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रावर विशेष सुविधा पुरविण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.

            पुणे जिल्ह्यात 67 हजार 279 दिव्यांगांची नोंद झाली असूनती राज्यात सर्वाधिक आहे. त्याखालोखाल कोल्हापूर जिल्ह्यात 24 हजार 197 व सांगलीमध्ये 21 हजार 742 जणांनी दिव्यांग म्हणून नोंदणी केली आहे. सर्वात कमी 2329 जणांनी हिंगोली जिल्ह्यात दिव्यांग असल्याची नोंद केली आहे.

            दिव्यांगांना मतदान करताना कोणताही त्रास होऊ नयेयासाठी मतदान केंद्रावर व्हिलचेअरची सुविधा करण्यात येणार आहे. दिव्यांगाना केंद्रापर्यंत सुलभपणे जाण्यासाठी रॅम्प उभारण्यात येतील. दिव्यांग मतदारांना सोईचे व्हावेम्हणून पहिल्या अथवा दुसऱ्या मजल्यावरील सुमारे 5400 मतदान केंद्रे तळमजल्यावर स्थलांतरीत करण्यात आले आहेत. जास्तीत जास्त दिव्यांग मतदारांनी मतदान करावेयासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.

यंदाचे वर्ष हे सुलभ निवडणूक (ॲक्सेसेबल इलेक्शन) म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त दिव्यांग नागरिकांनी मतदार म्हणून नोंदणी करावीयासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून विशेष प्रयत्न करण्यात आले. पीडब्ल्यूडी ॲपद्वारे दिव्यांगांची नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले.

मुंबई विमानतळाला सर्वोत्कृष्ट पर्यटन पुरस्कार

पर्यटनमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

नवी दिल्ली, 27 : पर्यटन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्रप्रभार) प्रल्हादसिंह पटेल यांच्या हस्ते देशातील सर्वोत्कृष्ट पर्यटकपूरक विमानतळाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्यातील अन्य तीन संस्थांनाही सन्मानित करण्यात आले.

केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून येथील विज्ञान भवनात ‘राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार 2017-18’ वितरण सोहळयाचे आयोजन करण्यात आले. यावेळी देशाच्या पर्यटन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे राज्य, संस्था व व्यक्तींना विविध श्रेणीत सन्मानित करण्यात आले. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे सचिव योगेंद्र त्रिपाठी आणि जागतिक पर्यटन संस्थेचे महासचिव झुराब पोलोलीकाशवीली यावेळी मंचावर उपस्थित होते.

विमानतळांच्या श्रेणीत देशातील दोन विमानतळांना सन्मानित करण्यात आले. मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला उच्च दर्जाच्या पर्यटक सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वोत्कृष्ट विमानतळाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विमानतळाच्या एरो कमर्शियल विभागाचे उप महाव्यवस्थापक आदित्य पंसारी आणि सहायक महाव्यवस्थापक तन्वीर मौलवी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

एकाच धावपट्टीवर 1004 हवाई उड्डाणाचा आपलाच विक्रम मोडीत काढणारे हे जगातील सर्वोत्कृष्ट विमातळ ठरले आहे. पर्यटकांना उत्तम सुविधा पुरविणा-या या विमानतळाने ताश्कंद, मँचेस्टर, फुकेट ,ग्वाँगझोवू , माले आणि दारेसलाम आदि शहरांसाठी नवीन उड्डाणसेवा सुरु केली आहे.

नाशिक व मुंबई येथील हॉटेल्सचाही सन्मान

नाशिक शहरातील ‘एक्सप्रेस इन हॉटेल’ हे देशातील सर्वोत्कृष्ट तीन तारांकीत हॉटेल ठरले आहे. आधुनिकतेसह पारंपारीक वास्तुशैलीचा उत्तम नमुना असलेले हे हॉटेल पर्यटक व अतिथींना उत्तम सुविधा देणारे हॉटेल आहे.

मुंबई येथील ‘द ललीत हॉटेल’ हे वैविध्यपूर्ण बैठक व्यवस्था पुरविणारे देशातील सर्वोत्तम हॉटेल ठरले आहे. छोटेखानी बैठकीपासून, लग्न समारंभ, व्यावसायिक संमलेन आयोजनासाठी या हॉटेलने पुरविलेल्या वैविध्यपूर्ण सेवांची या पुरस्कारासाठी दखल घेण्यात आली.

ग्रामीण भागात कृषी पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन देण्यात अग्रणी असलेल्या मुंबई येथील ‘कल्चर आंगन’ या संस्थेला सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन प्रकल्पाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘कल्चर आंगन’ ही संस्था स्थानिक लोकांच्या मदतीने ग्रामीण भागात कृषी पर्यटन क्षेत्र विकसित करीत असून महाराष्ट्रासह, राजस्थान आणि आंध्रप्रदेशातही प्रकल्प राबवित आहे.

मतदारांच्या सहाय्यासाठी ‘सी व्हिजील’, ‘व्होटर्स हेल्पलाईन’, ‘पीडब्ल्यूडी ॲप’

मुंबई, दि. 29 : मतदारांच्या सहाय्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत भर देण्यात येत असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी ‘सी व्हिजिल’ या ॲप्लिकेशनसह दिव्यांगासाठी ‘पीडब्ल्यूडी’ व ‘व्होटर्स हेल्पलाईन’ ही ॲप्लिकेशन्स उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ही तीनही ॲप्स गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत.

आदर्श आचारसंहितेच्या भंग झाल्याची तक्रार थेट भारत निवडणूक आयोगाकडे करता येते. निवडणुकीच्या अनुषंगाने येणाऱ्या खोट्या बातम्या, सार्वजनिक संपत्तीचे नुकसान, मतदारांना पैशाचे वितरण, मद्य अथवा मादक पदार्थांचे वितरण, शस्त्रांचे अवैध प्रदर्शन, धाकदपटशा, सांप्रदायिक द्वेषयुक्त भाषण, पैसे देऊन छापलेली बातमी (पेड न्यूज), वस्तूंचे मोफत वितरण, विनामूल्य वाहतूक सेवा आदी बाबींची तक्रार करण्यासाठी ‘सी व्हिजिल’ या प्रभावी ॲपचा वापर करू शकतात. एखाद्या ठिकाणी आचारसंहितेचा भंग होत असल्याचे आढळून आल्यास त्याचे छायाचित्र अथवा व्हिडिओ काढून ते या ॲपवर अपलोड करता येते. या तक्रारीची दखल निवडणूक आयोग घेत असते.

या निवडणुकीत दिव्यांग नागरिकांना विशेषतः विकलांग नागरिकांना मतदान करणे सोयीचे व्हावे, यासाठी pwd हे ॲप विकसित केले आहे. याद्वारे विकलांग व्यक्ती म्हणून सुलभतेने नोंद करता येते, नवीन मतदार नोंदणी, मतदार यादीतील नावाचे हस्तांतरण, मतदार यादीतील नावामध्ये सुधारणा अथवा नाव वगळणे, व्हिलचेअरसाठी विनंती, मतदान केंद्र शोधणे, अर्जाची स्थिती पाहणी आदी बाबीही सुलभ होतील.

‘व्होटर्स हेल्पलाईन’ या ॲपद्वारे मतदार यादीतील नाव शोधणे, नवीन अर्ज अथवा यादीतील नावाचे हस्तांतरण सहज शक्य होते. निवडणूक सेवाविषयक तक्रारी नोंदविता येतात व त्याची स्थिती समाजवून घेता येते. मतदान, निवडणूक, इव्हिएम, निकाल यासंदर्भातील शंकांचे निरसन, निवडणुकांचे वेळापत्रक, उमेदवारांची माहिती, निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी आदी माहिती या ॲपवर मिळू शकते. मतदानानंतर सेल्फी अपलोड करण्याची सुविधाही यामध्ये आहे.