August 11, 2020

Maharashtra Metro

online News Portal – Reg- no. MH08D0025117

पुण्‍यात अडकलेल्‍या 3270 नागरिकांना चंद्रपूरात येण्‍याचा मार्ग सुलभ

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने पुणे – चंद्रपूर निःशुल्‍क बससेवा उपलब्‍ध होणार

चंद्रपूर जिल्‍हयातील 3270 विद्यार्थी, कामगार व अन्‍य नागरिक लॉकडाऊनमुळे पुण्‍यात अडकले आहेत. सदर नागरिकांना चंद्रपूर येथे आणण्‍याच्‍या दृष्‍टीने पुणे ते चंद्रपूर निःशुल्‍क बसेस सोडाव्‍या अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्‍य शासनाकडे केली आहे. यासंदर्भात आ. मुनगंटीवार यांनी परिवहन मंत्री श्री. अनिल परब यांच्‍याशी दुरध्‍वनीद्वारे चर्चा केली. परिवहन मंत्री अनिल परब यांनी सदर मागणी मान्‍य करण्‍याचे आश्‍वासन त्‍यांना दिले.

चंद्रपूर जिल्‍हयातील 3270 विद्यार्थी, कामगार व अन्‍य नागरिकांचा डेटा आपल्‍याकडे तयार असुन सदर नागरिकांना चंद्रपूर येथे आणण्‍यासाठी पुणे ते चंद्रपूर विशेष बससेवा निःशुल्‍क उपलब्‍ध करावी व अडकलेल्‍या नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी परिवहन मंत्र्यांनी चर्चेदरम्‍यान आ. मुनगंटीवार यांनी केली. परिवहन मंत्री अनिल परब सदर मागणी मान्‍य करण्‍याचे आश्‍वासन दिल्‍याने पुण्‍यात अडकलेल्‍या नागरिकांचा चंद्रपूरात येण्‍याचा मार्ग सुलभ झाला आहे.

WhatsApp
error: Content is protected !!