August 11, 2020

Maharashtra Metro

online News Portal – Reg- no. MH08D0025117

मनपाची १२५३ लोकांवर कारवाई, २,५५,३४० रुपये दंड वसूल सार्वजनीक ठिकाणी थुंकणे, मास्क न वापरणे, विनापरवानगी दुकान सुरु ठेवण्याबाबत कारवाई    

चंद्रपुर १० जून  – कोरोनाच्या पार्श्वभुमीवर नियम मोडणाऱ्या १२५३ लोकांवर चंद्रपुर महानगरपालिकेच्या पथकांनी कारवाई केली असून नियमांचे पालन न करणाऱ्या नागरीकांकडून २,५५,३४० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. शहरात मास्कशिवाय फिरणार्‍या नागरिकांवर कारवाई करण्याबरोबरच सार्वजनीक ठिकाणी थुंकण्याऱ्या तसेच विनापरवानगी दुकान सुरु ठेवण्याऱ्या दुकानदारांवरही दंड ठोठावण्यात आला आहे.

कोरोनापासून बचावासाठी मास्कशिवाय घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. याबाबत शासनाकडुन स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत व त्यानुसार मनपातर्फेही मास्क लावण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र तरीही शहरात मास्क न लावता रस्त्यावर फिरणारे तसेच सार्वजनीक ठिकाणी थुंकणारे आढळून येत आहेत याशिवाय काही दुकानदार विनापरवानगी दुकान सुरु ठेवत असल्याचे आढळुन आल्याने मनपाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकार नागरीकांना घरातच राहण्याचे वारंवार आवाहन करत आहे.  चंद्रपुर शहरात प्रशासकीय स्तरावर उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, काही नागरिक मास्कशिवाय विनाकरण रस्त्यावर फिरत असल्याने तसेच सार्वजनीक ठिकाणी थुंकत असल्याने थुंकीच्या माध्यमातून कोरोनाच्या फैलावाची शक्यता आहे. अशा नागरिकांवर पोलिस कारवाईही केली जात आहे. मात्र, तरीही घराबाहेर पडण्याचे नागरिकांचे प्रमाण कमी झालेले नाही. त्यामुळे आता राज्य सरकारने पूर्वपरवानगी घेऊन घराबाहेर पडणार्‍यांनाही मास्क लावणे सक्तीचे केले आहे. त्यानुसार  शहरात मास्कशिवाय फिरणार्‍या व थुंकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

याची अंमलबजावणी २३ एप्रिलपासून  सुरू करण्यात आली असून मनपाच्या तीनही झोनमार्फत सक्तीने कारवाई करण्यात येत आहे. कारवाईदरम्यान मास्क लावण्याची समज देण्यात येऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या नागरीकांवर विशेष लक्ष देऊन कारवाई करण्यात येत आहे .
अतिक्रमण विभागाचे राहुल पंचबुद्धे, नामदेव राऊत, स्वच्छता निरीक्षक प्रदीप मडावी, उदय मैलारपवार, भूपेश गोठे,विवेक पोतनुरवार, महेंद्र हजारे, अनिरुद्ध राजुरकर, अनिल ढवळे यांच्याद्वारे सदर कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईसाठी प्रत्येक प्रभागात पथक तैनात केली आहेत.दंड करण्याची कारवाई सातत्याने सुरु राहणार असून आपल्या व इतरांच्या सुरक्षिततेसाठी मास्क लावुन ठेवण्याचे, सार्वजनीक ठिकाणी न थुंकण्याचे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

WhatsApp
error: Content is protected !!