Published by: 0

महाविकास आघाडी सरकारच्‍या विरोधात भाजपा महानगर शाखेचे चंद्रपूरात निषेध आंदोलन

नवीन कृषी कायद्यामुळे देशातील शेतकरी बंधमुक्‍त आणि दलालांच्‍या जोखडातून मुक्‍त होणार असून आपल्‍या कष्‍टाने पिकविलेल्‍या शेतमालाची विक्री व बाजारपेठेत त्‍यांना स्‍वातंत्र्य मिळणार आहे. पंतप्रधान मोदीजींनी एमएसपी कुठल्‍याही परिस्‍थीतीत बंद होणार नसल्‍याचे स्‍पष्‍ट केले आहे. या कृषी सुधारणा विधेयकामुळे शेतक-यांना ख-या अर्थाने स्‍वातंत्र्य मिळणार आहे, मात्र शेतक-यांबाबत महाविकास आघाडी सरकारने पुतना मावशीचे प्रेम दाखवत या कृषी विषयक कायद्याला स्‍थगिती दिली आहे. ही स्‍थगिती त्‍वरीत उठवावी व राज्‍यात केंद्राच्‍या या कायद्याची अंमलबजावणी करावी यासाठी हे निषेध आंदोलन आम्‍ही करीत असल्‍याचे प्रतिपादन भाजपाचे महानगर अध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी केले.

गांधी चौक चंद्रपूर येथे भाजपा महानगर शाखेतर्फे महाविकास आघाडी सरकारच्‍या विरोधात निषेध आंदोलन करण्‍यात आले. या आंदोलनात डॉ. मंगेश गुलवाडे यांच्‍यासह भाजपा नेते राजेंद्र गांधी, प्रकाश धारणे, महापौर सौ. राखी कंचर्लावार, उपमहापौर राहूल पावडे, मनपा गटनेता वसंत देशमुख, भाजयुमो महानगर अध्‍यक्ष विशाल निंबाळकर, मनपा सदस्‍य सुभाष कासनगोट्टूवार, रवी आसवानी, संदीप आवारी, संजय कंचर्लावार, माया उईके, देवानंद वाढई, राजेंद्र अडपेवार, शितल कुळमेथे, ज्‍योती गेडाम, जिल्‍हा परिषद सदस्‍य ब्रिजभूषण पाझारे, जि.प. सदस्‍या नितू चौधरी, भाजपा चंद्रपूर तालुकाध्‍यक्ष नामदेव डाहूले आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्‍यांनी किसानों के सन्‍मान में मोदी सरकार मैदान में, स्‍थगिती रद्द करा शेतक-यांना न्‍याय द्या, महाविकास आघाडीचे पुतना मावशीचे प्रेम, कृषी विधेयकांची राज्‍यात अंमलबजावणी करा, महाविकास आघाडी नव्‍हे तर महाबिघाडी अशा घोषणांचे फलक फडकावत राज्‍य सरकारचा निषेध केला. आंदोलनानंतर डॉ. मंगेश गुलवाडे यांच्‍या नेतृत्‍वात एका शिष्‍टमंडळाने मागणीचे निवेदन जिल्‍हाधिका-यांना सादर केले. आंदोलकांच्‍या भावना शासनापर्यंत पोहचविण्‍याचे आश्‍वासन जिल्‍हाधिका-यांनी शिष्‍टमंडळाला दिले. या आंदोलनात सोशल डिस्‍टन्‍सींग चे पालन करत माया चव्‍हाण, प्रशांत विघ्‍नेश्‍वर, विनोद चौधरी, विवेक बोडे, अनिल डोंगरे, राजेंद्र खांडेकर, प्रज्‍वलंत कडू,  भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *