हरियाणातील गुडगाव येथून आलेल्या चंद्रपूर जिल्हयातील मुल येथील तीस वर्षाच्या व्यक्तीचा कोरोना पॉझिटिव्ह

अहवाल आला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने दिलेल्या वृत्तानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या २५ झाली आहे.

२५ मे रोजी हरियाणातील गुडगाव येथून सदर व्यक्ती नागपूरला विमानाने आले. नागपूर वरून स्वतःच्या वाहनाने मूल येथे आल्यानंतर त्यांना गृह अलगीकरण करण्यात आले. 3 जून रोजी गृहअलगीकरणामध्ये असताना त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता. आज तो पॉझिटिव्ह आला असून त्यांच्या कुटुंबातील अन्य सहा सदस्यांचे देखील आज स्वॅब घेण्यात येणार आहे. सदर व्यक्तीला चंद्रपूर येथे विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले आहे.

चंद्रपूरमध्ये आतापर्यत २ मे ( एक रुग्ण ), १३ मे ( एक रूग्ण) २० मे ( एकूण १० रूग्ण ) २३ मे ( एकूण ७ रूग्ण ) व २४ मे ( एकूण रूग्ण २ ) २५ मे ( एक रूग्ण ) ३१ मे ( एक रुग्ण ) २जून ( एक रूग्ण ) ४ जून ( एक रुग्ण )अशा प्रकारे जिल्हयातील रुग्ण २५ झाले आहेत.आतापर्यत २२ रुग्णांना बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे २५ पैकी अॅक्टीव्ह रुग्णाची संख्या आता ३ आहे.

मध्यरात्री युनियन बँकेला आग

चंद्रपूर : शहरातील मध्यवर्ती भागातील छोटा बाजार चौकातील युनियन बँकेच्या कार्यालयात काल मंगळवारला रात्री आग लागली. रात्री ११ वाजताच्या सुमाराला घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली.

आगीची माहिती होताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येत बँकेच्या समोर गोळा झाले. यावेळी प्रशासनाच्या सामाजिक अंतराचे आदेशही पायदळी तुडविण्यात आले.घटनेची माहिती होताचा बँकेचे अधिकारी पोहचले. आत मोठ्या प्रमाणात रोकड होती.

त्यामुळे ती जळण्याची भिती निर्माण झाली. दरम्यान अग्निशमन दल आणि पोलिस पोहचले. एका तासाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. बँकेला लागूनच दाटीवाटीने निवासी वस्ती आहे. आग वेळीच आटोक्यात आली तर मोठा अनर्थ झाला असता. आग नेमकी कशामुळे लागली, याच कारणांचा शोध घेतला जाणार आहे. जवळपास दहा लाख रूपयांचे नुकसान झाले, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी शीलवंत नांदेडकर यांनी दिली.

चंद्रपूर ब्रेकिंग शहरामध्ये न्यूज छोटा बाजार तिथल्या युनियन बँकेला भीषण आग

चंद्रपूर- छोटा बाजार चौकातील युनियन बँकेच्या कार्यालयाला आज रात्री 11.30 वाजाताच्या सुमाराला आग लागली. आगीचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.दरम्यान अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी पोचले. आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयन्त सुरू होता … बाकी सविस्तर माहिती नंतर

चंद्रपूर शहरामध्ये छोटा बाजार तिथल्या युनियन बँकेला भीषण आग

चंद्रपूर- छोटा बाजार चौकातील युनियन बँकेच्या कार्यालयाला आज रात्री 11.30 वाजाताच्या सुमाराला आग लागली. आगीचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.दरम्यान अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी पोचले. आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयन्त सुरू होता …. बाकी माहिती नंतर

दुचाकी चोरट्यास विठ्ठलमंदिर वार्ङातून अटक

आज दिनांक 2 जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी विठ्ठल मंदिर वार्ड परिसरात पेट्रोलिंग करत असताना गुप्त माहितीच्या आधारे माहिती मिळाली की, चंद्रपूर शहर व रामनगर पोलीस स्टेशन रेकॉर्डवरील गुन्हेगार साहिल उर्फ बाल्या राजू आंबेकर (21 वर्ष) हा दुचाकी चोर येथे आहे. त्याची चौकशी करण्यात आली. त्याच्याकडून चोरीची होंडा मोपेड विना क्रमांकाची गाङी 50 हजारासह सह ताब्यात घेण्यात आले.

सदर मोपेड गाडी ही बाबटनगर परिसरातून चोरी गेली होती. सदर गुन्हेगारांकडून यापूर्वीही स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोरी घरफोडी या प्रकरणात गुन्हे उघडकीस आणले होते. आरोपी साहिल ऊर्फ राजू आंबेकर राहणार विठ्ठल मंदिर वार्ङ विरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार क्रमांक 49/ 20 भादंवि 379 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संजय आकतूलवार,पोलीस शिपाई अमजद खान, पोलीस शिपाई प्रशांत नागोसे, विनोद जाधव, मयूर येरमे यांनी केली.

दुचाकी चोरट्यास विठ्ठलमंदिर वार्ङातून अटक

आज दिनांक 2 जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी विठ्ठल मंदिर वार्ड परिसरात पेट्रोलिंग करत असताना गुप्त माहितीच्या आधारे माहिती मिळाली की, चंद्रपूर शहर व रामनगर पोलीस स्टेशन रेकॉर्डवरील गुन्हेगार साहिल उर्फ बाल्या राजू आंबेकर (21 वर्ष) हा दुचाकी चोर येथे आहे. त्याची चौकशी करण्यात आली. त्याच्याकडून चोरीची होंडा मोपेड विना क्रमांकाची गाङी 50 हजारासह सह ताब्यात घेण्यात आले.
सदर मोपेड गाडी ही बाबटनगर परिसरातून चोरी गेली होती. सदर गुन्हेगारांकडून यापूर्वीही स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोरी घरफोडी या प्रकरणात गुन्हे उघडकीस आणले होते. आरोपी साहिल ऊर्फ राजू आंबेकर राहणार विठ्ठल मंदिर वार्ङ विरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार क्रमांक 49/ 20 भादंवि 379 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संजय आकतूलवार,पोलीस शिपाई अमजद खान, पोलीस शिपाई प्रशांत नागोसे, विनोद जाधव, मयूर येरमे यांनी केली.

चंद्रपूरमध्ये 7 रुग्णांना सुटी ; ॲक्टिव कोरोना रुग्णांची संख्या 3

चंद्रपूर,दि. 2 जून: चंद्रपूर जिल्ह्यातील 7 रुग्ण मंगळवार दिनांक 2 जून रोजी कोरोना आजारातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे.आतापर्यंत एकूण 20 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून सध्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 3 आहे. या तिनही रुग्णांची प्रकृती स्थिर आहे,अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
जिल्ह्यातील कोविड-19 ची सर्वसाधारण माहिती पुढीलप्रमाणे आहे.

आतापर्यंत 1 हजार 13 स्वॅब नमुने तपासणीस पाठविले होते. यापैकी पॉझिटिव्ह 23 नमुने, निगेटिव्ह 906 नमुने तर 84 नमुने प्रतीक्षेत आहेत.
ग्रामस्तरावर 3 हजार 110 नागरिकांचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. तालुकास्तरावर 306 नागरिकांचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. तर जिल्हास्तरावर 322 नागरिकांचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहेत, असे एकूण जिल्ह्यातील 3 हजार 738 नागरिकांचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे.

आतापर्यंत जिल्ह्यामध्ये 73 हजार 679 नागरिक दाखल झाले आहेत. तसेच, 65 हजार 672 नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण झालेले आहेत. तर 8 हजार 7 नागरिकांचे गृह अलगीकरण सुरू आहे.
जिल्ह्यामध्ये अन्य राज्यातून व अन्य जिल्ह्यातून रेडझोन मधून प्रवास करून आलेल्या रुग्णांची संख्या पुढील प्रमाणे आहे. नवी दिल्ली( एक रूग्ण ), मुंबई( चार रुग्ण), ठाणे ( दोन रुग्ण), पुणे ( सहा रूग्ण ), यवतमाळ ( दोन रुग्ण ), नाशिक (तीन रुग्ण) तसेच कोणत्याही प्रकारच्या प्रवासाचा इतिहास नाही किंवा पॉझिटीव्ह रूग्णांच्या सहवासातील संख्या 5 आहे.

चंद्रपूरमध्ये 2 मे ( एक रुग्ण ), 13 मे ( एक रूग्ण), 20 मे ( एकूण 10 रूग्ण ), 23 मे ( एकूण 7 रूग्ण ), व 24 मे ( एकूण रूग्ण 2 ), 25 मे ( एक रूग्ण ),31मे ( एक रुग्ण ) अशा प्रकारे जिल्हयातील रुग्ण 23 झाले आहेत.आता पर्यत 20 रुग्णांना बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे 23 पैकी अॅक्टीव्ह रुग्णाची संख्या 3 आहे.

चंद्रपूरमध्ये 7 रुग्णांना सुटी ; ॲक्टिव कोरोना रुग्णांची संख्या 3

चंद्रपूर,दि. 2 जून: चंद्रपूर जिल्ह्यातील 7 रुग्ण मंगळवार दिनांक 2 जून रोजी कोरोना आजारातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे.आतापर्यंत एकूण 20 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून सध्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 3 आहे. या तिनही रुग्णांची प्रकृती स्थिर आहे,अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
जिल्ह्यातील कोविड-19 ची सर्वसाधारण माहिती पुढीलप्रमाणे आहे. आतापर्यंत 1 हजार 13 स्वॅब नमुने तपासणीस पाठविले होते. यापैकी पॉझिटिव्ह 23 नमुने, निगेटिव्ह 906 नमुने तर 84 नमुने प्रतीक्षेत आहेत.

ग्रामस्तरावर 3 हजार 110 नागरिकांचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. तालुकास्तरावर 306 नागरिकांचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. तर जिल्हास्तरावर 322 नागरिकांचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहेत, असे एकूण जिल्ह्यातील 3 हजार 738 नागरिकांचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे.
आतापर्यंत जिल्ह्यामध्ये 73 हजार 679 नागरिक दाखल झाले आहेत. तसेच, 65 हजार 672 नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण झालेले आहेत. तर 8 हजार 7 नागरिकांचे गृह अलगीकरण सुरू आहे.

जिल्ह्यामध्ये अन्य राज्यातून व अन्य जिल्ह्यातून रेडझोन मधून प्रवास करून आलेल्या रुग्णांची संख्या पुढील प्रमाणे आहे. नवी दिल्ली( एक रूग्ण ), मुंबई( चार रुग्ण), ठाणे ( दोन रुग्ण), पुणे ( सहा रूग्ण ), यवतमाळ ( दोन रुग्ण ), नाशिक (तीन रुग्ण) तसेच कोणत्याही प्रकारच्या प्रवासाचा इतिहास नाही किंवा पॉझिटीव्ह रूग्णांच्या सहवासातील संख्या 5 आहे.
चंद्रपूरमध्ये 2 मे ( एक रुग्ण ), 13 मे ( एक रूग्ण), 20 मे ( एकूण 10 रूग्ण ), 23 मे ( एकूण 7 रूग्ण ), व 24 मे ( एकूण रूग्ण 2 ), 25 मे ( एक रूग्ण ),31मे ( एक रुग्ण ) अशा प्रकारे जिल्हयातील रुग्ण 23 झाले आहेत.आता पर्यत 20 रुग्णांना बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे 23 पैकी अॅक्टीव्ह रुग्णाची संख्या 3 आहे.

लॉकडाऊनमध्ये काही बाबींमध्ये शिथिलता

चंद्रपूर, दि. 1 जून: जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनच्या काही बाबींमध्ये शिथिलता देण्यात आली आहे.यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी आज आदेश काढले आहे.जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूंचा प्रसार होवू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी संपूर्ण जिल्ह्यात कलम 144 लागू असणार आहे.

 

आंतरराज्य व आंतरजिल्हा विनापरवाना प्रवासी वाहतुकीकरिता बंद असेल.परराज्यात / राज्यातर्गत (चंद्रपूर जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात) प्रवासाकरिता http://covid19.mhpolice.in यावर ऑनलाईन अर्ज करावा.

चंद्रपूर जिल्हा बाहेरून सक्षम अधिकाऱ्याची परवानगी घेऊन जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींना आरोग्य विभाग यांचेकडून देण्यात आलेल्या निर्देशानुसार 14 दिवस होम क्वारन्टाईन किंवा संस्थात्मक विलगीकरण करण्यात येईल होम क्वारन्टाईन किंवा संस्थात्मक विलगीकरण करण्यात आलेली व्यक्ती इतरत्र फिरताना आढळल्यास रुपये 2 हजार दंड व मास्कचा वापर न केल्यास रुपये 200 इतका दंड आकारण्यात येईल व संबंधित व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहिताचे कलम 188, 269,270 ,271 नुसार कार्यवाही करण्यात येईल.

65 वर्षावरील व्यक्ती,मधुमेह व्यक्ती व 10 वर्षाचे आतील बालके गर्भवती महिला यांनी अत्यावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी व वैद्यकीय उद्देशा शिवाय घराबाहेर निघू नये.

अत्यावश्यक सेवेतील शासकीय कर्मचारी/ अधिकारी व संबंधित व्यक्ती यांचे व्यतिरिक्त इतर व्यक्तींच्या हालचालीस रात्री 9 ते सकाळी 5 या वेळेत प्रतिबंध राहील.

सार्वजनिक स्थळी पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र जमा होऊ नये.धार्मिक स्वरूपाचे समुपदेशन धर्मपरिषद धार्मिक गर्दीचे आयोजन करू नये.कोरोना विषाणुच्या अनुषंगाने कोणत्याही नागरिकांनी समाजात जनमानसात अफवा अपप्रचार व भीती व्हाट्सअप फेसबूक,ट्विटर, वृत्तपत्र, सोशल मीडिया व होर्डिंग इत्यादी वर प्रसारित करू नये तसेच अधिकृत माध्यमाद्वारे माहिती न घेता दिशाभूल करणारी माहिती प्रसारमाध्यमांवर प्रसारित करू नये.

कोरोना विषाणूच्या अनुषंगाने घोषित करण्यात आलेल्या क्वारटाईन स्थळांच्या 100 मीटर परिसरातर्गत एकत्रित येण्यास व हालचाल करण्यास निर्बंध घालण्यात येत आहे.

खाजगी व सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतील असे सर्व प्रकारचे मिरवणूक,रॅली, सामूहिक कार्यक्रम ,समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, सण-उत्सव ,उरूस ,जत्रा, मनोरंजनाचे कार्यक्रम, क्रीडा व इतर सर्व स्पर्धा, आंदोलने यांना मनाई राहील.

खाजगी व सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतील अशा सर्व प्रकारची कृत्ये, कार्यशाळा ,प्रशिक्षण वर्ग,देशांतर्गत व परदेशी सहल यांचे आयोजन करण्यासाठी मनाई राहील.

शॉपिंग कॉम्प्लेक्स, मॉल, सुपरमार्केट, मनोरंजनाची ठिकाणे ,क्लब /पब, क्रीडांगणे, मैदाने,जलतरण, तलाव, उद्याने, सिनेमागृहे, नाट्यगृहे ,शाळा, महाविद्यालये, खाजगी शिकवणी वर्ग, व्यायामशाळा ,संग्रहालये ,गुटखा तंबाखू, पान विक्री इत्यादी बंद राहील.

निवासाची सोय असलेले सर्व हॉटेल /लॉज /खाजगी विश्रामगृह बंद राहतील. सामाजिक अंतर ठेवून दैनंदिन बाजार भरवता येईल परंतु आठवडी बाजार भरविता येणार नाही.तसेच,सलुन,स्पा, बार्बरशॉप ,ब्युटी पार्लर, केस कर्तनालय बंद राहतील.

जीवनावश्यक असलेल्या पुढील बाबी कार्यरत राहतील:-

अत्यावश्यक किराणा सामान, दुग्ध /दुग्धोत्पादने, फळे व भाजीपाला, पार्सल स्वरूपात काउंटर तसेच इतर मार्गांनी विक्री/ वितरण व वाहतूक करण्यास परवानगी राहील.

जीवनावश्यक खाद्यपदार्थ किराणा, दूध,दुग्धजन्य पदार्थ विक्री व वाहतूक, ब्रेड, फळे, भाजीपाला, अंडी, मांस मासे बेकरी, पशुखाद्य यांची किरकोळ विक्री सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहील. परंतु, आपले दुकान आस्थापना समोर आणि फुटपाथवर कोणत्याही प्रकारचे साहित्य ठेवता येणार नाही.

जीवनावश्यक वस्तु विक्री व वितरण इ. आस्थापना/दुकाने या व्यतिरिक्त इतर सर्व प्रकारची आस्थापना/दुकाने सोमवार ते शनिवार या दिवशी सकाळी 9 ते सायंकाळी 05 या वेळेत सुरु राहतील व रविवार ला सदर दुकाने पुर्णत: बंद राहतील. परंतु, आपले दुकान/आस्थापना समोर आणि फुटपाथवर कोणत्याही प्रकारचे साहित्य ठेवता येणार नाही.

महानगरपालिका/नगरपालिका/नगरपंचायत/ग्रामपंचायत यांचेकडुन प्राप्त झालेले परवानाधारक फेरीवाले यांची ठेले/ दुकाने सोमवार ते शनिवार या दिवशी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरु राहतील व रविवारला सदर दुकाने पुर्णत: बंद राहतील.

खाद्य पदार्थ, किराणा, दूध, ब्रेड, फळे,भाजीपाला,अंडी, मांस ,मासे यांची वाहतुक व साठवण.अत्यावश्यक वस्तूंची पुरवठासाखळी आणि वाहतूक. पार्सल स्वरूपात सुविधा उपलब्ध करून देण्याचे अटीवर उपहारगृहे, खाद्यगृहे घरगुती खानावळ स्वीट मार्केट फरसाण सेंटर व चहा नाष्टा सेंटर सुरू राहतील तथापि प्रत्यक्ष दुकानात ग्राहकांसाठी बैठक व्यवस्थेस मनाई असेल.

पावसाळी ऋतू संबंधित साहित्य जसे छत्री, रेनकोट, प्लॅस्टिक शीट, कव्हर यांचा समावेश जीवनावश्यक वस्तूंमध्ये करण्यात येत आहे.त्यामुळे सदर साहित्याची विक्री व वितरणाबाबत वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहील.

लग्न समारंभाकरिता पुढीलप्रमाणे परवानगी राहतील:

लग्न समारंभ (50 लोकांच्या उपस्थितीत) सामाजिक अंतर राखून करण्यास परवानगी असेल. परंतु, सदर परवानगीही उपविभागीय अधिकारी/ तहसिलदार यांचेकडून प्राप्त करणे बंधनकारक राहील.तसेच,अंत्यविधी करिता सामाजिक अंतर राखून 20 लोकांचे उपस्थितस परवानगी राहील.

प्रवास व प्रवासी वाहतूकी संबंधाने पुढील बाबी कार्यरत राहतील:

जिल्हांतर्गत प्रवासाकरिता बस सेवा व 50 टक्के प्रवासी क्षमतेचा सामाजिक अंतर राखून निर्जंतुकीकरण उपाय राबवून सुरू राहतील.

जिल्हा अंतर्गत प्रवास करण्यात (दुचाकी /चारचाकी वाहनाने) नागरिकास कोणत्याही परवानगीची आवश्यकता राहणार नाही. परंतु, चारचाकी वाहनाच्या बाबतीत वाहन चालकासह केवळ दोन प्रवासी वैद्य राहील आणि वाहनांमध्ये सँनीटायझर ठेवून प्रवास करणाऱ्या व्यक्तीस मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील. तसेच दुचाकी करिता केवळ दुचाकीचालक यांनाच वाहन चालविण्यास परवानगी असेल.

महानगरपालिका ,नगरपालिका/ नगरपंचायत क्षेत्राकरिता प्रवासी वाहतूक करिता रिक्षा /ऑटोरिक्षा चालक व दोन प्रवाशांसह रिक्षा ऑटोरिक्षाची वाहतूक सुरू राहील

परंतु रिक्षा /ऑटोरिक्षा मध्ये सँनीटायझर ठेवणे व मास्कचा वापर करणे बंधनकारक असेल सदर वाहतूक ही ग्रामीण क्षेत्राकरिता लागू राहणार नाही.

दुचाकी चारचाकी रिक्षा ऑटोरिक्षा याद्वारे सायंकाळी 9 ते सकाळी 5 या कालावधीत प्रवास करता येणार नाही.

शासकीय व खाजगी कार्यालय संबंधाने पुढील बाबी कार्यरत राहतील:

जिल्ह्यातील सर्व शासकीय,निमशासकीय महामंडळ कार्यालय शंभर टक्के कर्मचारी अधिकारी यांची उपस्थिती सुरू राहतील परंतु कोविड-19 संबंधाने राज्य शासनाकडून दिनांक 17 एप्रिल 2020 रोजीच्या अधिसूचनेत दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील.

शेतीविषयक उत्पादन/ सुविधा /आस्थापना संबंधाने पुढील बाकी कार्यरत राहतील:

सर्व प्रकारचे शीतगृहे /वखार ,गोदामा संबंधित सेवा /घाऊक वितरणासाठी आणि सदर बाबींशी संबंधित पुरवठा साखळी.कृषी उत्पादन व किमान आधारभूत किंमत यांच्याशी संबंधित कार्य करणारी कृषी उत्पन्न बाजार समिती व राज्य शासनातर्फे अधिकृत असलेले मंडी बाजार विशेषतः कापूस, तुर व धान खरेदी,-विक्री आस्थापना /दुकाने कार्यरत राहतील.

शेतकरी व शेतमजूर यांचेकडून करण्यात येणारी शेतीविषयक कामे मासेमारी व मत्स्य व्यवसाय संबंधित सर्व कामे व शेती विषयक अवजारे /यंत्र विक्री व दुरुस्ती संबंधित मान्यताप्राप्त दुकाने /आस्थापना (किमान मनुष्यबळासह) सुरू राहतील.

शेती संबंधित यंत्रे /अवजारे चालविण्यासाठी आवश्यक असणारा मजूरवर्ग /केंद्र. खते कीटकनाशके व बियाणे यांच्याशी निगडित उत्पादन व पॅकेजिंग आणि किरकोळ विक्री संबंधित उद्योग/ आस्थापना /दुकाने संपूर्ण जिल्ह्याकरिता सोमवार ते शनिवार या दिवशी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरू राहतील व रविवारला सदर दुकाने पूर्णता बंद राहील.

उपरोक्त प्रमाणे परवानगी देण्यात आलेले कामाचे ठिकाण,सार्वजनिक स्थळे,दुकाने आस्थापना, प्रतिष्ठाने येथे कार्यरत कामगारांस,कर्मचारी तसेच सुविधेचे लाभ घेणारे जिल्ह्यातील सर्व नागरिक यांनी कायम मास्कचा वापर करणे तसेच आरोग्य सेतु अॅपचा वापर करणे बंधनकारक राहील.

सदरील आदेशाचे पालन न करणारी, उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समूह यांनी साथरोग प्रतिबंधक कायदा, 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तसेच भारतीय दंड संहिता कलम 188,269,270,271 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व नियमानुसार कारवाई करण्यात येईल.

सदरचा आदेश संपुर्ण जिल्हयामध्ये दिनांक 1 जून ते दिनांक 30 जून या कालावधीकरिता लागू राहील.तसेच, प्रतिबंधीत क्षेत्राकरिता (कंटेनमेंट झोन) लागु राहणार नाही.

 

राज्‍यातील 14,314 ग्राम पंचायतींना सरपंच, उपसरपंच व सदस्‍यांसह सहा महिने मुदतवाढ द्यावी – आ. सुधीर मुनगंटीवार त्वरीत अध्‍यादेश काढण्‍याची मागणी

राज्‍यात 2020 या वर्षात 14,314 ग्राम पंचायतींची मुदत संपत आहे. राज्‍यातील कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव वाढती रूग्‍णसंख्‍या लक्षात घेता या ग्राम पंचायतींना सरपंच, उपसरपंच व सदस्‍यांसह सहा महिने मुदतवाढ देण्‍यात यावी व त्‍वरीत याबाबत अध्‍यादेश काढण्‍यात यावा, अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्‍यमंत्री उध्‍दव ठाकरे यांच्‍याकडे केली आहे.

आ.  सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्‍यमंत्र्यांना पाठविलेल्‍या पत्रात म्‍हटले आहे की, ज्‍या ग्राम पंचायतींची मुदत यावर्षी संपत आहे अशा 14,314 ग्राम पंचायतींमध्‍ये प्रशासक नेमण्‍याच्‍या हालचाली सुरू झाल्‍या आहे. मार्च 2020 च्‍या विधीमंडळ अधिवेशनात राज्‍य शासनाने सहकारी संस्‍था, मध्‍यवर्ती सहकारी बँका यांना मुदतवाढ दिली. त्‍याच धर्तीवर सदर ग्राम पंचायतींचे सरपंच, उपसरपंच व सदस्‍यांना काळजीवाहू म्‍हणून मुदतवाढ देण्‍याची आवश्‍यकता आहे. ग्राम पंचायत निवडणूक ही कोणत्‍याही पक्षाच्‍या चिन्‍हावर, विचारावर लढली जात नाही.

ग्रामीण भागातील जनता आपल्‍या गावातील प्रश्‍न सोडविण्‍यासाठी या निवडणूकीत सहभागी होवून सरपंच, उपसरपंच, सदस्‍यांना निवडून देतात. मात्र पालकमंत्र्यांच्‍या माध्‍यमातुन या ग्राम पंचायतींवर प्रशासक बसविण्‍यात यावे असा आग्रह ग्रामविकास विभागाचे काही अधिकारी करीत आहेत.

या 14,314 ग्राम पंचायतींमध्‍ये कोकण विभागामध्‍ये 813, पुणे विभागामध्‍ये 2885, नाशिक विभागामध्‍ये 2506, अमरावती विभागामध्‍ये 2473, औरंगाबाद विभागामध्‍ये 4112, नागपूर विभागामध्‍ये 1525 ग्राम पंचायती आहेत.

या ग्राम पंचायतींना सरपंच, उपसरपंच व सदस्‍यांसह सहा महिने मुदतवाढ मिळणे अत्‍यंत गरजेचे आहे. प्रशासक बसवून लोकशाही मुल्‍यांचा –हास न करता लोकशाहीचे संरक्षण व संवर्धन करण्‍याच्‍या दृष्‍टीने याप्रकरणी त्‍वरीत सहा महिने मुदतवाढ देण्‍यासाठी अध्‍यादेश काढण्‍याची मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.