चंद्रपूर जिल्हातील बाधीताची संख्या ४७ जिल्हयात आणखी तीन पॉझिटीव्ह

 

चंद्रपूर शहरांमध्ये तुकूम परिसरात आणखी दोन महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. बाधिताच्या संपर्कातील या दोन्ही महिला आहेत. तर ब्रह्मपुरी तालुक्यातील अड्याळ टेकडी येथील पॉझिटिव्ह बाधिताच्या संपर्कातील तळोधी खुर्द येथील आणखी एक नागरिक बाधित आढळून आला आहे. रविवारी तीन नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या ४७ झाली आहे.

जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सुमित्रा नगर, तुकुम परिसरातील प्रतिबंधित क्षेत्रातील बाधीत रुग्णाची ४७ वर्षीय पत्नी व ३० वर्षीय मुलीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. दोघींची प्रकृती स्थिर आहे.
दुसरा २० वर्षीय युवक अड्याळ टेकडी येथील बाधितांच्या संपर्कातील आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील तळोधी खुर्द येथील या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे.

चंद्रपूरमध्ये आतापर्यत २ मे ( एक बाधीत ), १३ मे ( एक बाधीत) २० मे ( एकूण १० बाधीत ) २३ मे ( एकूण ७ बाधीत ) व २४ मे ( एकूण बाधीत २ ) २५ मे ( एक बाधीत ) ३१ मे ( एक बाधीत ) २जून ( एक बाधीत ) ४ जून ( दोन बाधीत ) ५ जून ( एक बाधीत ) ६जून ( एक बाधीत ) ७ जून ( एकूण ११ बाधीत ) ९ जून ( एकूण ३ बाधीत ) १०जून ( एक बाधीत ) १३ जून ( एक बाधीत ) आणि १४ जून ( एकूण ३ बाधीत ) अशा प्रकारे जिल्हयातील कोरोना बाधीत ४७ झाले आहेत.आतापर्यत २४ बाधीत बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे ४७ पैकी अॅक्टीव्ह बाधीतांची संख्या आता २३ झाली आहे.

चंद्रपूर जिल्हात आणखी एक पॉझिटीव्ह बाधीताची संख्या पोहचली ४३ वर

चंद्रपूर शहरांमध्ये बुधवारी तुकूम परिसरातील सुमित्रा नगर भागात रहिवासी असणारे ४५ वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी आलेल्या अहवालात ४५ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यासोबतच चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधिताची संख्या ४३ झाली आहे. गेल्या आठ दिवसांपासून बाधीताला लक्षणे होती. वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात त्यांना ८ जून रोजी खासगी रुग्णालयातून दाखल करण्यात आले होते. काल ९ जून त्यांचा स्वॅब घेण्यात आला. त्यांच्या परिवारात त्यांच्यासह एकूण पाच जण असून अन्य चार सदस्यांचीही स्वॅब तपासणी केली जाणार आहे. या बाधीताची प्रवासाची कोणतीही नोंद नाही.

चंद्रपूरमध्ये आतापर्यत २ मे ( एक बाधीत ), १३ मे ( एक बाधीत) २० मे ( एकूण १० बाधीत ) २३ मे ( एकूण ७ बाधीत ) व २४ मे ( एकूण बाधीत २ ) २५ मे ( एक बाधीत ) ३१ मे ( एक बाधीत ) २जून ( एक बाधीत ) ४ जून ( दोन बाधीत ) ५ जून ( एक बाधीत ) ६जून ( एक बाधीत ) ७ जून ( एकूण ११ बाधीत ) ९ जून ( एकूण ३ बाधीत ) आणि १०जून ( एक बाधीत ) अशा प्रकारे जिल्हयातील कोरोना बाधीत ४३ झाले आहेत.आतापर्यत २३ बाधीत बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे ४३ पैकी अॅक्टीव्ह बाधीतांची संख्या आता २० झाली आहे.

मनपाची १२५३ लोकांवर कारवाई, २,५५,३४० रुपये दंड वसूल सार्वजनीक ठिकाणी थुंकणे, मास्क न वापरणे, विनापरवानगी दुकान सुरु ठेवण्याबाबत कारवाई    

चंद्रपुर १० जून  – कोरोनाच्या पार्श्वभुमीवर नियम मोडणाऱ्या १२५३ लोकांवर चंद्रपुर महानगरपालिकेच्या पथकांनी कारवाई केली असून नियमांचे पालन न करणाऱ्या नागरीकांकडून २,५५,३४० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. शहरात मास्कशिवाय फिरणार्‍या नागरिकांवर कारवाई करण्याबरोबरच सार्वजनीक ठिकाणी थुंकण्याऱ्या तसेच विनापरवानगी दुकान सुरु ठेवण्याऱ्या दुकानदारांवरही दंड ठोठावण्यात आला आहे.

कोरोनापासून बचावासाठी मास्कशिवाय घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. याबाबत शासनाकडुन स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत व त्यानुसार मनपातर्फेही मास्क लावण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र तरीही शहरात मास्क न लावता रस्त्यावर फिरणारे तसेच सार्वजनीक ठिकाणी थुंकणारे आढळून येत आहेत याशिवाय काही दुकानदार विनापरवानगी दुकान सुरु ठेवत असल्याचे आढळुन आल्याने मनपाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकार नागरीकांना घरातच राहण्याचे वारंवार आवाहन करत आहे.  चंद्रपुर शहरात प्रशासकीय स्तरावर उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, काही नागरिक मास्कशिवाय विनाकरण रस्त्यावर फिरत असल्याने तसेच सार्वजनीक ठिकाणी थुंकत असल्याने थुंकीच्या माध्यमातून कोरोनाच्या फैलावाची शक्यता आहे. अशा नागरिकांवर पोलिस कारवाईही केली जात आहे. मात्र, तरीही घराबाहेर पडण्याचे नागरिकांचे प्रमाण कमी झालेले नाही. त्यामुळे आता राज्य सरकारने पूर्वपरवानगी घेऊन घराबाहेर पडणार्‍यांनाही मास्क लावणे सक्तीचे केले आहे. त्यानुसार  शहरात मास्कशिवाय फिरणार्‍या व थुंकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

याची अंमलबजावणी २३ एप्रिलपासून  सुरू करण्यात आली असून मनपाच्या तीनही झोनमार्फत सक्तीने कारवाई करण्यात येत आहे. कारवाईदरम्यान मास्क लावण्याची समज देण्यात येऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या नागरीकांवर विशेष लक्ष देऊन कारवाई करण्यात येत आहे .
अतिक्रमण विभागाचे राहुल पंचबुद्धे, नामदेव राऊत, स्वच्छता निरीक्षक प्रदीप मडावी, उदय मैलारपवार, भूपेश गोठे,विवेक पोतनुरवार, महेंद्र हजारे, अनिरुद्ध राजुरकर, अनिल ढवळे यांच्याद्वारे सदर कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईसाठी प्रत्येक प्रभागात पथक तैनात केली आहेत.दंड करण्याची कारवाई सातत्याने सुरु राहणार असून आपल्या व इतरांच्या सुरक्षिततेसाठी मास्क लावुन ठेवण्याचे, सार्वजनीक ठिकाणी न थुंकण्याचे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

चंद्रपूर जिल्हातील बाधीताची संख्या पोहचली ४२ वर

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काल मंगळवारी रात्री आणखी तीन नागरिकांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यासोबतच जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ४२ झाली आहे. नवीन तीनही रुग्ण बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे पॉझिटिव्ह ठरले आहेत.

जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार ब्रह्मपुरी तालुक्यातील जुगनाळा गावातील ४३ वर्षीय एका बाधितांची ३३ वर्षीय पत्नी व पाच वर्षाचा मुलगा संपर्कातून पॉझिटिव्ह झाला आहे. या बाधितांना चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

अन्य एक बाधित ब्रह्मपुरी तालुक्यातील बरड किन्ही येथील २२ वर्षाचा युवक असून अड्याळ टेकडी येथील बाधीताच्या संपर्कातील आहे. संस्थात्मक अलगीकरण कक्षात असलेल्या या युवकाला उशीरा लक्षणे दिसायला लागली. त्यामुळे त्याचे स्वॅब घेण्यात आले होते.

चंद्रपूरमध्ये आतापर्यत २ मे ( एक बाधीत ), १३ मे ( एक बाधीत) २० मे ( एकूण १० बाधीत ) २३ मे ( एकूण ७ बाधीत ) व २४ मे ( एकूण बाधीत २ ) २५ मे ( एक बाधीत ) ३१ मे ( एक बाधीत ) २जून ( एक बाधीत ) ४ जून ( दोन बाधीत ) ५ जून ( एक बाधीत ) ६जून ( एक बाधीत ) ७ जून ( एकूण ११ बाधीत ) आणि ९ जून ( एकूण ३ बाधीत )अशा प्रकारे जिल्हयातील कोरोना बाधीत ४२ झाले आहेत.आतापर्यत २३ बाधीत बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे ४२ पैकी अॅक्टीव्ह बाधीतांची संख्या आता १९ आहे.

सीमावर्ती भागात नक्षल हालचाली?

जिल्ह्याच्या सीमेवर नक्षल्यांच्या हालचाली
सीमावर्ती ठाण्यांच्या बंदोबस्तात वाढ; एलसीबीतील ३१ पोलिस कर्मचाऱ्याच्या बदल्या

चंद्रपूर ता. ९ : लॉकडाउनमुळे पोलिस कर्मचाèयांवरील कामाचा ताण आधीच वाढला आहे. अशात तेलंगणा राज्याच्या सीमा परिसरात नक्षलवाद्यांच्या गुप्त हालचाली सुरू असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. नक्षल्यांच्या बिमोडासाठी पोलिस विभागाने जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात तगडा बंदोबस्त करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेतील तब्बल ३१ पोलिस कर्मचाèयांच्या तडकाफडकी बदल्या केल्या. पोलिस अधीक्षकांनी सोमवारी (ता. ८) बदलीचे आदेश काढले. गृहमंत्र्याच्या जिल्हा भेटीनंतर अवघ्या दोन दिवसांत बदल्या झाल्याने पोलिस वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

चंद्रपूर जिल्ह्याची सीमा तेलंगणा राज्याला लागून आहे. जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात विरूर स्टे., लाठी, धाबा, भारी, गोंडपिपरी, वणी कॅम्प, टेकामांडवा, जिवती, पिटीगुड्डा येथे पोलिस ठाणे, उपपोलिस ठाणे कार्यरत आहेत. उपलब्ध मनुष्यबळावर या ठाण्यांचा कारभार सुरू आहे.

अशात तेलंगणा राज्यात नक्षलवाद्यांनी गुप्त हालचाली सुरू केल्याची माहिती पोलिस विभागाला प्राप्त झाली. त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सीमावर्ती भागातील पोलिस ठाण्यांत तगडा बंदोबस्त वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सोमवारी तातडीने बदलीचे आदेश जारी करीत स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत ३१ कर्मचाèयांना संबंधित पोलिस ठाण्यांत रुजू होण्याचे निर्देश दिले आहेत.

विरूर पोलिस ठाण्यात पद्माकर भोयर, पंडित वèहाडे, महेंद्र भुजाडे, लाठी येथे रवींद्र बोरकर, सुरेश केमेकर, धनराज करकाडे, धाबा येथे राजेंद्र खनके, संजय आकुलवार, प्रकाश बल्की, भारी येथे मनोज रामटेके, अविनाश दशमवार, अनुप डांगे, प्रफुल्ल मेश्राम, मिqलद जांभुळे, अमजद पठाण, गोंडपिपरी येथे नईम खान, अमोल धंदरे, कुंदनqसग बावरी, वणी कॅम्प येथे विनोद जाधव, रवींद्र पंधरे, प्रांजल झिलपे, गजानन नागरे, जावेद सिद्दीकी, टेकामांडवा येथे संतोष बगमारे, नितीन रायपुरे, प्रशांत नागोसे, जिवती येथे गोपाल आतुलवार, संदीप मुळे, पिट्टीगुडा येथे मयूर येरणे, जमीर पठाण, मिqलद चव्हाण यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पुढील आदेशापर्यंत या कर्मचाèयांना संबंधित पोलिस ठाण्यात बंदोबस्तासाठी कायम ठेवण्यात येणार आहे.
स्थानिक गुन्हे शाखेतील कर्मचाèयांच्या बदल्या करण्यात येणार असल्याची चर्चा मागील अनेक महिन्यांपासून होती. कोरोनाच्या एन्ट्रीनंतर ही चर्चा थांबली. मात्र, आता नक्षलवाद्यांच्या गुप्त हालचाली वाढल्याचे कारण पुढे करीत एलसीबीतील तब्बल ३१ पोलिस कर्मचाèयांच्या तातडीने बदल्या करण्याचा निर्णय पोलिस अधीक्षकांनी घेतला आहे. विशेष म्हणजे, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दोन दिवसांपूर्वी जिल्ह्याला भेट दिली. त्यानंतर अचानक बदल्या करण्यात आल्याने पोलिस कर्मचारी वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना ऊत आला आहे.

एलसीबीतील अवघे चार अधिकारी
पोलिस विभागात स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) ही महत्त्वाची शाखा मानली जाते. जिल्ह्यात कुठेही कारवाई करण्याची त्यांना परवानगी असते. पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्याकडे या शाखेच्या निरीक्षकपदाचा प्रभार आहे. सहा वेगवेगळ्या पथकामाङ्र्कत शाखेचे काम सुरू आहे. मात्र, अचानक ३१ पोलिस कर्मचाèयांच्या बदल्या करण्यात आल्याने सर्व पथके रिकामी झाली. सद्यःस्थितीत कोकोटे यांच्या मदतीला गदादे, बोबडे, मुंडे ही पोलिस अधिकारी मंडळी सोबतीला आहे.

इंदिरा नगरात साडेचार लाख दारूसाठा जप्त तिघे ताब्यात ; रामनगर पोलिसांची कारवाई

चंद्रपूर : शहरातील इंदिरानगर परिसरात सोमवारी (ता. ८) रामनगर पोलिसांनी एका बुलोरा वाहनातून दीड लाखांचा दारूसाठा जप्त केला. एकूण मुद्देमालाची किमत साडेचार लाख रुपये आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली.
इंदिरानगरात एका वाहनातून दारूसाठा येत असल्याची माहिती रामनगर पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच रामनगर पोलिसांचे एक पथक इंदिरानगर परिसरात पाळत ठेवून होते. एमएच३४-१५७४ या क्रमांकाचे बुलोरो पीकअप वाहन इंदिरानगरातील माता मंदिर परिसरात आले. या वाहनावर पोलिसांना संशय आला. पोलिसांच्या पथकाने तातडीने वाहन थांबवून तपासणी केली. वाहनात देशीदारूच्या १५ पेट्या होत्या. याची किमत दीड लाख रुपये आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक ए. वाय. मलीक, सुमित खैरे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी केली.

एकाने केली आत्महत्या ; दुसऱ्याचा आकस्मिक मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज सकाळी दोन वेगवेगळ्या दुर्दैवी घटनांमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील इन्स्टिट्यूशनल कारेन्टाइन अलगीकरण कक्षात दोघांचा मृत्यू झाला.
यापैकी चंद्रपूर येथील श्याम नगर भगतसिंग चौक येथील रहिवासी असणाऱ्या ३० वर्षीय युवकाने सकाळी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतीगृहातील अलगीकरण कक्षात ७.३०च्या सुमारास आत्महत्या केली. हा युवक नागपूर येथून आल्यानंतर अलगीकरण कक्षामध्ये होता.

दुसऱ्या घटनेत अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या निवासी कक्षामध्ये शासकीय निवासस्थान आपल्या कुटुंबासह अलगीकरणात असणार्‍या ४० वर्षीय नागरिकाचा प्रकृती अस्वास्थामुळे आकस्मिक मृत्यू झाला. मूळचे यवतमाळ जिल्हयातील वणी तालुक्यातील शिरपूर गावाचे आहे. त्यांचे कुटुंब त्यांच्यासोबत यावेळी होते. त्यांची प्रकृती स्थिर होती. कुटुंबासोबत त्यांचा सकाळी संवादही झाला. सकाळी साडेसातला ते आराम करत होते.

झोपेतच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या दोन्ही मृतकांचे कोरोना स्वॅब देखील घेण्यात येणार आहेत. या दोन्हीही रुग्णांची प्रकृती स्थिर होती. दोन्हीही रुग्ण शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वेगवेगळ्या इमारतीमध्ये अलगीकरणात होते. या दोन्ही ठिकाणी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार , मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले, अतिरिक्त पोलीस अधिकारी प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत नांदेडकर यांनी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.

धक्कादायक घटना समोर आली आहे राम नगर पोलीस स्टेशन येथील उपनिरीक्षक लाकडे त्यांच्यावर प्राणघातक हल्ला दारू तस्करांनी केला

चंद्रपूर : दारुतस्करी करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करून आरोपीला पोलीस ठाण्यात नेत असताना आरोपींनी पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला चढविला. यात रामनगर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक जीवन लाकडे यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी अमित गुप्ता हा फरार आहे. तर त्याचे दोन सहकारी आणि आईवडील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामनगर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक जीवन लाकडे यांना अमित गुप्ता नावाचा व्यक्ती आपल्या चारचाकी वाहनातून दारुतस्करी करीत असल्याची माहिती मिळाली. यानुसार लाकडे हे एक पोलीस कर्मचारी आणि सहायक कर्मचाऱ्याला घेऊन डिस्पेन्सरी चौकात गेले. यावेळी अमित गुप्ताला याची भनक लागली आणि त्याने हे वाहन आपल्या घराकडे पळविले.

महाकाली चौक परिसरातील त्याच्या घरी पोलीस येऊन धडकले. वाहनाची तपासणी केली असता त्यात देशीदारूच्या चार पेट्या आढळून आल्या. यानंतर पोलिसांनी त्याला पुढील कारवाईसाठी रामनगर पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना लाकडे आणि आरोपी अमित गुप्ता यांच्यात झटापट झाली.

यावेळी आरोपीचे आईवडील आणि दोन सहकारी देखील आले. त्यांनी लाकडे यांना मारहाण केली. यात लाकडे यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी करून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपी अमित गुप्ता हा फरार आहे.

चंद्रपूर मध्ये 12 पॉझिटिव्ह रुग्ण झाले बरे

चंद्रपूर,दि.29 मे: चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 12 रुग्ण कोरोना आजारातून बरे झाले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी आज दिली.

जिल्ह्यामध्ये यापूर्वी 2 मे ( एक रूग्ण ), 13 मे ( एक रुग्ण ) 19 व 20 मे ( 10 रुग्ण ) पॉझिटिव्ह आढळले होते. या एकूण 12 रुग्णांना आत्तापर्यंत जिल्हा प्रशासनाने कोरोना आजारातून बरे झाले असल्याचे जाहीर केले आहे. यातील पहिला रुग्ण नागपूर येथून डिस्चार्ज करण्यात आला होता.तर एका युवतीला दोन दिवसांपूर्वी बरे झाल्यामुळे सुटी देण्यात आली. आ

विभागाने नव्याने जाहीर केलेल्या आरोग्य सूत्रानुसार 19 व 20 मे रोजी पॉझिटिव्ह निघालेल्या रुग्णांना 10 दिवसानंतर कोणतेही लक्षणे न दिसल्यामुळे या आजारातून बरे झाल्याचे जाहीर करण्यात आले. आता 10 रुग्ण जिल्ह्यात वैद्यकीय वास्तव्यात आहे.

कोविड-19 संक्रमित रुग्णांच्या संपर्कातील संशयित व्यक्तींना शोधून त्यांना संस्थात्मक अलगीकरण कक्षात व गृह अलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे. कंटेनमेंट झोनमध्ये सर्व कुटुंबातील लोकसंख्येचे दैनंदिन 14 दिवस आरोग्य पथकांमार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे. तसेच, आयएलआय, सारीचे रुग्ण शोधून त्यांना उपचाराखाली आणण्यात येत आहे.

जिल्ह्यात एकूण 10 कंटेनमेंट झोन कार्यान्वित असून सदरील झोनमधील रुग्णांचा व इतर सर्व रुग्णांचा नियमित पाठपुरावा सुरू आहे. 10 कंटेनमेंट झोनमध्ये 71 आरोग्य पथकामार्फत 3 हजार 151 घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून 12 हजार 69 सर्वेक्षित लोकसंख्या आहे.तर,आयएलआय, सारीचे 9 नमुने घेतले असून सर्वच आयएलआय, सारीच‌े 9 नमुने निगेटिव्ह आले आहेत.

कोविड-19 संक्रमित 22 रुग्णांची चंद्रपूर जिल्ह्यात इतर राज्यातून, जिल्ह्यातून,रेडझोन मधून प्रवास केल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील राज्यनिहाय व जिल्हानिहाय एकूण संख्या पुढील प्रमाणे आहे. दिल्ली -1,मुंबई-3, ठाणे -2, पुणे-6, यवतमाळ -2, नाशिक -3, कोणत्याही प्रकारचा प्रवासाचा इतिहास नाही किंवा पॉझिटिव्ह रुग्णांचे सहवासीत -5 आहे.

जिल्ह्यातील कोविड-19 ची सर्वसाधारण माहिती पुढील प्रमाणे आहे. एकूण 906 स्वॅब नमुने तपासणी पाठविले होते. यापैकी पॉझिटिव्ह 22 नमुने असून निगेटिव्ह 817 आहे तर 67 नमुने प्रतीक्षेत आहेत.

दिनांक 29 मे रोजी एकूण जिल्ह्यातील संस्थात्मक अलगीकरणात 4 हजार 419 नागरिक आहेत. यापैकी ग्रामस्तरावर 3 हजार 586 नागरिक, तालुकास्तरावर 482 नागरिक तर जिल्हास्तरीय 351 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत 71 हजार 914 नागरिक जिल्ह्यामध्ये दाखल झाले आहेत. तसेच,61 हजार 134 नागरिकांची गृह अलगीकरण पूर्ण झाले असून 10 हजार 780 नागरिकांचे गृह अलगीकरण सुरू आहे.

स्‍वातंत्र्यवीर सावरकरांच्‍या जयंतीनिमीत्‍त आ. सुधीर मुनगंटीवार यांचे नमन

स्‍वातंत्र्यवीर विनायक दामोधर सावरकर यांच्‍या 137 व्‍या जयंतीदिनानिमीत्‍त महाराष्‍ट्राचे माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी स्‍वातंत्र्यवीर सावरकरांच्‍या प्रतिमेला मालार्पण करून त्‍यांना नमन केले.

स्‍वातंत्र्यलढयातील एका क्रांतीकारक चळवळीचे धुरीण, स्‍वातंत्र्यपूर्व आणि स्‍वातंत्र्योत्‍तर भारतीय राजकारणातील महत्‍वाचे राजकारणी तसेच हिंदु संघटक व हिंदुत्‍वाचे एक विशिष्‍ट तत्‍वज्ञान मांडणारे एक तत्‍वज्ञ, विज्ञानाचा पुरस्‍कार व जातीभेदाला तिव्र विरोध करणारे समाज क्रांतीकारक, भाषाशुध्‍दी व लिपिशुध्‍दी या चळवळींचे प्रणेते, प्रतिभावंत साहित्‍यीक आणि प्रचारक असे बहुआयामी व्‍यक्‍तीमत्‍वाचे धनी असलेले स्‍वातंत्र्यवीर सावरकर हे आमचा मानबिंदू आहे. सावरकर माने तेज, सावरकर माने त्‍याग, सावरकर माने तप, सावरकर माने तत्‍व अशा शब्‍दात श्रध्‍देय अटलबिहारी वाजपेयी यांनी आपल्‍या कवितेतुन सावरकरांचे वर्णन केले आहे. अशा या प्रखर राष्‍ट्रभक्‍ताला आपण नमन करीत असल्‍याचे आ. मुनगंटीवार म्‍हणाले.

यावेळी जिल्‍हा परिषद सदस्‍य ब्रिजभूषण पाझारे, उपमहापौर राहूल पावडे, डॉ. मंगेश गुलवाडे, प्रज्‍वलंत कडू, सुरज पेदुलवार, खेमराज दिवसे, कुणाल शेंडे, दत्‍तप्रसन्‍न महादाणी, अनिल वनकर, आदींची उपस्थिती होती.